आयुर्विज्ञान व अभियांत्रिकीच्या समन्वयातून नवे तंत्रज्ञान यावे
By admin | Published: January 15, 2017 12:53 AM2017-01-15T00:53:29+5:302017-01-15T00:53:29+5:30
आयुर्विज्ञान आणि अभियांत्रिकी या स्वतंत्र ज्ञान शाखा असल्या तरी त्यांच्या संशोधनातून
वेदप्रकाश मिश्रा : आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
वर्धा : आयुर्विज्ञान आणि अभियांत्रिकी या स्वतंत्र ज्ञान शाखा असल्या तरी त्यांच्या संशोधनातून व समन्वयातून भविष्यात लोकांना अधिक निकोप आरोग्य देणारे नवे तंत्रज्ञान विकसित व्हावे, असे प्रतिपादन कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती तसेच दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. सावंगी (मेघे) येथे आयोजित आंतराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
मेघे समूहातील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात द्विदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी नगर युवक शिक्षण संस्थेचे सचिव सागर मेघे तर व्यासपीठावर कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्र-कुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे, आॅस्ट्रेलियातील प्रो. रूसेल फ्रँको डिसुझा, युनाईटेड किंगडम येथील प्रा. पद्मा सिंग खाडा, भारतीय जनआरोग्य संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. संजय झोडपे, दिल्ली आयआयटीचे उपसंचालक प्रा. एम. बालकृष्णन, डॉ. एस. एम. पटेल, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, डॉ. राजीव बोरले, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. एस. आर. तनखीवाले, डॉ. ललित वाघमारे, डॉ. श्याम भुतडा, प्राचार्य बी. डी. कुळकर्णी, डॉ. सोहन सेलकर, अभ्युदय मेघे, डॉ. अभय गायधने, डॉ. एस. झेड. काझी, प्राचार्य डॉ. सचिन उंटवाले, डॉ. यु. पी. वाघे उपस्थित होते. या द्विदिवसीय परिषदेत सचिन निकरंगे यांनी अमेरिकेत उपलब्ध असणाऱ्या दर्जेदार फेलोशिपच्या संधीबाबत मांडणी केली. आरोग्य तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्णतेबाबत डॉ. बी. रामाकृष्णन यांनी मत मांडले. बंगलोरचे डॉ. प्रमोद सुतारावे, डॉ. डिसुझा, प्रा. एम. बालकृष्णन, प्रा. संजय झोडपे, प्रा. पद्मा सिंग खाडा, डॉ. मॅरी मॅथ्थ्यू, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेसच्या प्रो. कांचन मुखर्जी, युनाईटेड किंगडम येथील डॉ. प्रमोद रिझमी, डॉ. अभय कुथे, डॉ. रूपेश घायर, पटीयाला पंजाब येथील डॉ. आशीष सिंगला, नांदेड येथील डॉ. मनीष कोकारे, करण चैतन्य, राजेंद्र तोजपूरकर, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. अर्चना पटेल, मध्यप्रदेश भोपाळ येथील प्रा. अभिजित पखारे, अमेरिकेतील प्रा. लिकॉन ग्रे, डॉ. युवराज एल. सिंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आभार डॉ. सचिन उंटवाले यांनी मानले. सदर द्विदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत देशविदेशातील एकूण ३५० प्रतिनिधींनी आपले शोधनिबंध सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अभय गायधने, डॉ. काझी, प्रा. रश्मी पांढरे, डॉ. शैलेश केडिया, डॉ. सोनाली चौधरी तसेच मेघे ग्रुपमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)