ईएमओच्या दुर्लक्षाने नवजात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:19 PM2018-11-01T22:19:17+5:302018-11-01T22:19:53+5:30

येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता धरला.

Newborn baby dies without neglecting EMO | ईएमओच्या दुर्लक्षाने नवजात बालकाचा मृत्यू

ईएमओच्या दुर्लक्षाने नवजात बालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देरुग्णवाहिका न थांबविता धरला पुढचा मार्ग : आरोग्य उपकेंद्रात कुटुुुंंबीयांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता धरला. परिणामी वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून कुटूबींयानी उपआरोग्य केंद्रात आक्रोश करुन संताप व्यक्त केला.
आकोलीच्या गोसावी नगरातील जयवंता रवि माईंदे या गरोदर मातेला प्रसुतीसाठी सकाळी पावणे दहा वाजता आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी उपकेंद्रात मसाळा लघू आरोग्य केंद्राच्या परिचारिका अर्चना बावणे, आशा वर्कर नम्रता खैरकार व अंगणवाडी सेविका संगीता पिंपळे उपस्थित होत्या. गरोदर मातची प्रकृती बघता परिचारिका बावणे यांनी १०८ क्रमांकावर फोन करुन तातडीने रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. काही वेळाने उपआरोग्य केंद्राजवळ रुग्णवाहिका पोहचली.पण, रुग्णवाहिकेतील ईएमओने येथील रुग्णाच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करीत कन्नमवारग्रामला जाणे खूप महत्वाचे आहे ,असे सांगून रुग्णवाहिका पुढे दामटली. त्यामुळे पुन्हा परिचारिका बावणे यांनी १०८ वर संपर्क साधून दुसरी रुग्णवाहिका बोलावली. त्यानुसार रुग्णवाहिका पोहोचलीही परंतू तोपर्यंत स्त्री लिंगी बाळाचा मृत्यू झाला होता. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर मातेवर उपचार होणे गरजेचे असताना नातेवाईकांनी एकच गोंधळ घातल्याने उपचारात अडचणी येऊ लागल्या. संतप्त नातेवाईकांनी टेबलवरील साहित्याची फेकाफेक सुरू केली. मातेचा विचार करुन उपस्थित सोमनाथ सोळंकी, अरविंद काकडे, मधुकर देवढे, दिलीप बेनपे, लालगिर भुराणी यांनी कुटुंबीय व समाजातील महिला,पुरुषांची समजूत काढली. तेव्हा जमाव शांत झाल्याने मातेला पुढील उपचाराकरिता सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.नातेवाईकांच्या मागणीनुसार बाळाचे शवविच्छेदन केले. त्यावरुन बाळाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सध्या मातेवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.
घरीच बाळंतपण करण्याची मानसिकता बदलण्याची गरज
आकोली आरोग्य उपकेद्राच्या कार्यक्षेत्रात पारधी, बेलदार आणि गोसावी समाजाची संख्या लक्षणीय आहे. आजही त्यांचा कल घरीच बाळंतपण करण्याकडे असतो. रुग्णाला अगदी वेळेवर दवाखाना व उपकें द्रात आणतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीही धावपळ होत असल्याने या समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
येथील आरोग्य सेविका सयाम यांना निलंबित केल्यानंतर त्यांचा पदभार कुणाकडेही सोपविण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णांच्या सेवेचा विचार करून त्यांचा प्रभार सोपविण्याची गरज व्यक्त होत असल्याने वरिष्ठांनी लक्ष द्यावे.

Web Title: Newborn baby dies without neglecting EMO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.