कत्तलीसाठी जाणाऱ्या नऊ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:31 AM2018-07-09T00:31:47+5:302018-07-09T00:32:30+5:30
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी करून वाहनात कोंबुन कत्तलीसाठी घेवून जाणाºया नऊ जनावरे ताब्यात घेतली. सदर जनावरांमध्ये सहा गाय तर तीन गोºह्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला मालवाहू वाहन जप्त केले असून आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी करून वाहनात कोंबुन कत्तलीसाठी घेवून जाणाºया नऊ जनावरे ताब्यात घेतली. सदर जनावरांमध्ये सहा गाय तर तीन गोºह्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला मालवाहू वाहन जप्त केले असून आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवाहूत जनावरांना कोंबुन समुद्रपूर मार्गे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहीती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. ती माहिती बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ समुद्रपूरच्या ठाणेदारांना दिली. माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी आपल्या हालचालींना वेग देत नाकेबंदी करून काही मालवाहूंची तपासणी केली. दरम्यान एम. एच. ३२ क्यू. ३७२४ क्रमांकाच्या मालवाहूची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याचे दिसून आले. सदर जनावरे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आल्याने ती पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय ज्या मालवाहूतून जनावरांची अवैध वाहतूक केल्या जात होती तो मालवाहूही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई समुद्रपूरचे ठाणेदार प्रविण मुंडे व यांच्या चमुने बजरंग दलाचे महेंद्र झाडे, सतीश ठाकरे, राजेश भुरे, निखिल महाजन, करण खुरपडे, आकाश चौव्हाण, सौरभ आत्राम, आकाश ठाकरे यांच्या सहकार्याने केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.