नऊ तास राबून मिळतात २०० रुपये
By admin | Published: June 28, 2014 11:44 PM2014-06-28T23:44:54+5:302014-06-28T23:44:54+5:30
शासनाच्या विविध विकासात्मक योजनांत काम करणाऱ्या मजुरांचे कत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात आहे़ नऊ तास जड कामे करणाऱ्या मजुरांची अवघ्या २०० रुपयांत बोळवण केली जात आहे़
अधिकाऱ्यांदेखत शोषण : शासकीय कामावरील मजुरांसोबतचा प्रकार
आकोली : शासनाच्या विविध विकासात्मक योजनांत काम करणाऱ्या मजुरांचे कत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात आहे़ नऊ तास जड कामे करणाऱ्या मजुरांची अवघ्या २०० रुपयांत बोळवण केली जात आहे़ मजूर संघटन नसल्याने अधिकाऱ्यांच्या हजेरीत आर्थिक पिळवणूक केली जात आहे़
शासनाचे रस्ते बांधकाम, ग्रा़पं़ भवन निर्मिती, रपटे व पुलाचे बांधकाम सर्वत्र सुरू आहे़ अनेक ठिकाणी नदी, नाल्यावर बांध बांधण्याचे काम सुरू आहे़ ही सर्व कामे करीत असताना त्यांच्या घामाने ही कामे पुर्णत्वास जातात़ त्या मजुरांच्या पिळवणुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ माती-गोटे, सिमेंटची कामे करताना मजुरांची कंबर तुटते़ राब-राबूनही तुटपुंजी मजुरी मजुराच्या हातावर ठेवली जाते़ दिवस उजाडल्यापासून सुरू होणारे काम ५ वाजता संपते़ मधे एक तासाची सवलत असते़ या एका तासात जेवण करून कामाला लागणारा मजूर व त्याचे हात सायंकाळीच थांबतात़ कष्टकरी माणसाला इतर कोणत्याही क्षेत्रात वाव नसल्याने शासकीय कामावर जावे लागते़ मजुरांचे संघटन नसल्याने लेबर कंत्राटदाराचे चांगलेच फावले आहे़ कामगार अधिकारी तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)