ना आमरस, ना उसाचा रस, आहे केवळ ‘व्हायरस’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:00 AM2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:26+5:30
उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा रस, उसाचा रस, कोल्ड्रींक्स, ज्यूस, टरबूज, खरबुज, द्राक्ष अशा विशेष फळांची विक्रीची रेलचेल असते. लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत या फळांचे आकर्षण प्रत्येकात असते. परंतु, विशेष करून यावर्षी कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या संकटामुळे आंब्याचा रस आणि उसाच्या रसाची पाहिजे तशी चव चाखायला मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या. रविवारचे तापमान ४० डिग्रीच्यावर होते. आता उन्हाचा पारा चढता आहे. मात्र, अचानक ओढवलेले कोरोना संसर्गाचे संकट आणि खबरदारीसाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यावर्षी ना आमरस, ना उसाचा रस आहे फक्त व्हायरस आणि पारा चढला तरी चर्चा केवळ कोरोनाचीच दिसून येत आहे.
उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा रस, उसाचा रस, कोल्ड्रींक्स, ज्यूस, टरबूज, खरबुज, द्राक्ष अशा विशेष फळांची विक्रीची रेलचेल असते. लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत या फळांचे आकर्षण प्रत्येकात असते. परंतु, विशेष करून यावर्षी कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या संकटामुळे आंब्याचा रस आणि उसाच्या रसाची पाहिजे तशी चव चाखायला मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. कारणा लॉकडाउन असल्यामुळे तशीही खाद्य पदार्थ आणि कोल्ड्रींक्स आणि ज्यूस सेंटर बंदच आहे. त्यामुळे बाजारपेठेत रसवंती, कोल्ड्रींक्स, ज्यूस सेंटरची दुकाने लावण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. तर दुसरीकडे गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मूसळधार पावसामुळे आंब्यासह अनेक पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत आंबा तसाही दिसेनासे झाला. आणि उन्हाचा पारा चढता जरी असला तरी चर्चा मात्र कोरोनाचीच असल्याने या लॉकडाउनमध्ये बच्चे कंपनीसह मोठ्यांना सुद्धा आंबा, उसाच्या रसाचा विसरच पडलेला दिसतो. कारण असे की, कोरोना संसर्गाच्या रुग्णांत हात असलेल्या वाढीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात लॉकडाउन किती दिवस चालणार आणि घरखर्च कसा चालणार यासह अनेक प्रश्न घरातील कर्त्या माणासांसमोर उभे आहेत. अशात केवळ जगण्यासाठी आवश्यक वस्तूंवरच खर्च करताना अनेक जण दिसत आहे.
पारा चढता; मात्र एसी, कुलर बंदच
कोरोना संसर्गासाठी थंड वातावरण घातक असल्याचे म्हटले आहे. आणि दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे यावर्षी कुलर विक्री, दुरुस्तीचे कामे पूर्णत: ठप्प झाली आहे. तसेच ज्यांच्याकडे एसी आहेत ते सुद्धा एसी बंद ठेवून उष्णतेत राहणे पसंत करत असून बरेचजण खिडक्या उघड्या ठेवून साध्या पंखयांच्या हवेत झोपणे पसंत करताना दिसून येत आहेत.