आवास योजनेत गावातील एकही व्यक्तीच नाव नाही, लाभार्थी नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:56 IST2025-02-24T16:54:55+5:302025-02-24T16:56:18+5:30
Wardha : सर्कसपूर ग्रामपंचायत येथे पीएमओ आवास योजना दुसरा टप्पा वाटप

Not a single person from the village is named in the housing scheme, beneficiaries are upset
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात आलेल्या लाभार्थीना डीबीटीद्वारे अनेक ग्रामपंचायतींतील लाभार्थीना देण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सर्कसपूर येथेदेखील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु यामध्ये सर्कसपूर, देऊरवाडा, वाढोणा येथील एकही लाभार्थीला लाभ मिळाला नसल्याने लाभार्थीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. 'महाआवास' योजनेतून केंद्र सरकारने 'पंतप्रधान आवास योजना' ग्रामीण टप्पा - २ जाहीर केला आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीत वाटप
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घरकुल सरकारने मंजूरदेखील केले. यावेळी सर्कसपूर, देऊरवाडा व वाढोणा येथील इच्छुकांना नावे न आल्याने त्यांना लाभासाठी काही काळ वाट बघावी लागेल. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे यांनी नुकतेच आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यासाठी ७हजार ३३५ घरकुल मंजूर करून आणले. परंतु सर्कसपूर, देऊरवाडा, वाढोणामधून टप्पा -२ मध्ये लाभार्थी नसल्याने यावरदेखील आमदार सुमित वानखेडे तोडगा काढतील, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.