‘नोटा’ बदलवू शकतो अनेकांच्या मतांचा ‘कोटा’

By admin | Published: October 9, 2014 11:05 PM2014-10-09T23:05:51+5:302014-10-09T23:05:51+5:30

आठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर

'Nota' can be changed by many votes 'Quota' | ‘नोटा’ बदलवू शकतो अनेकांच्या मतांचा ‘कोटा’

‘नोटा’ बदलवू शकतो अनेकांच्या मतांचा ‘कोटा’

Next

रूपेश खैरी - वर्धा
आठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याकरिता असलेल्या नोटाचा वापर झाला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे याचा वापर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आघाडीत झालेली बिघाडी व युतीत झालेला काडीमोड यामुळे आतापर्यंत एकमत असलेले अनेक कार्यकर्ते दुखावले. अशात उमेदवारी देताना झालेली घाई व काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे पक्षाचे खंदे कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांची नाराजी ते प्रचारातून दाखवित नसताना दिसून येत आहे. हा मतदार उमेदवारांना मते देतो वा नकाराधिकाराचा वापर करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे उमेदवारांकडून वर्तविली जाणारी भाकितेही बदलण्याची शक्यता आहे.
सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह अनेकांनी रिंगणात उड्या घेतल्या आहेत. चारही मतदार संघातून एकूण ६९ उमेदवार रिंगणात आले आहेत. यात कधी राजकीय मित्र म्हणून सोबत बसणारे समोरासमोर आले आहेत. उमेदवारांच्या या भाऊगर्दीत मतदारही विचलीत होत आहे.
शिवाय होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रचारातून स्थानिक मुद्यांना तिलांजली देण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकाही उमेदवाराने स्थानिक विकासाकरिता काय करणार याचा कुठलाही खुलासा केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मतदारही विचारात पडला आहे.
असाच प्रकार लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता. यामुळे अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ या बटनाचा वापर करून आपली नाराजी दर्शविली होती. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात असलेल्या आठही तालुक्यात दोन हजार १९० मतदारांनी याचा वापर केला होता. यात आर्वी विधानसभा क्षेत्रात ४००, देवळीत ४७४, हिंगणघाट ५४३ तर वर्धेत सर्वाधिक ७७३ मतदारंनी नकाराधिकाराचा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीतही या बटनाचा वापर करण्याची मुभा आहे. यामुळे त्याचा परिणाम कोणत्या विधानसभा क्षेत्रात अधिक होईल हे मतदानानंतरच कळेल.

Web Title: 'Nota' can be changed by many votes 'Quota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.