आता रेशनऐवजी रक्कम; साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:37 PM2024-10-08T16:37:05+5:302024-10-08T16:38:09+5:30

शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना : एपीएल शेतकरी कार्डधारकांना मिळतोय लाभ

Now amount instead of ration; Benefit to eight and a half thousand farmers | आता रेशनऐवजी रक्कम; साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ

Now amount instead of ration; Benefit to eight and a half thousand farmers

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी दरमहा १७० रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत २ हजार ४६६ कार्डधारक असून, ८ हजार ७४६ शेतकरी लाभार्थीच्या खात्यात जुलैपर्यंतची रक्कम टाकण्यात आली आहे.


अन्य रेशनकार्डधारक शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही यापूर्वी दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो गव्हाचा लाभ देण्यात येत होता. मात्र, या योजनेत यानंतर धान्य पुरविता येणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे व १ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाला कळविले आहे. त्यामुळे या रेशन कार्डधारकांना आता रेशनधान्याऐवजी दरमहा १५० रुपये देण्याचे पुरवठा विभागाने सुरू केलेले आहे. त्यानंतर या रकमेमध्ये २० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता प्रतिलाभार्थी १७० रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थीना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुनादेखील तेथेच मिळतो. अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे. 


तालुकानिहाय लाभार्थी शिधापत्रिकाधारक
आर्ची - १,१८६
देवळी - ४,१९१
हिंगणघाट - १,९६६
वर्धा - १,४०३


लाभार्थी संख्या - ८,७४६
शेतकरी रेशनकार्डधारक - २,४६६

"एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी पैसे देण्यात येत आहेत. जिल्ह्यात एपीएल डीबीटीद्वारे ८,७४६ लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे." 
- शालिकराम भराडी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: Now amount instead of ration; Benefit to eight and a half thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.