आता वीज ग्राहकांना तात्काळ मिळेल पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:05 PM2018-12-31T21:05:33+5:302018-12-31T21:05:56+5:30

महावितरणच्या वर्धा मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या देवळी आणि खरांगणा उपविभागातील वीज ग्राहकांना नवीन वर्षापासून जनमित्रा मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास तत्काळ (आॅन दि स्पॉट) पावती देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दोन्ही उपविभागांतील सुमारे २८ हजार वीजग्राहकांना मिळणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली आहे.

Now the power consumers will get an instant receipt | आता वीज ग्राहकांना तात्काळ मिळेल पावती

आता वीज ग्राहकांना तात्काळ मिळेल पावती

Next
ठळक मुद्देनववर्षात महावितरणची भेट : देवळी, खरांगणा उपविभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महावितरणच्या वर्धा मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या देवळी आणि खरांगणा उपविभागातील वीज ग्राहकांना नवीन वर्षापासून जनमित्रा मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास तत्काळ (आॅन दि स्पॉट) पावती देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दोन्ही उपविभागांतील सुमारे २८ हजार वीजग्राहकांना मिळणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली आहे.
या अगोदर महावितरणचे जनमित्र थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकीत रक्कम गोळा करून वीजबिल भरणा केंद्रात जमा करीत होते. नंतर पक्की पावती वीजग्राहकांना पोहोचती केली जायची. यात जनमित्रांचा बराच वेळ जायचा. तसेच या दोन्ही वीज उपविभागात वीजबिल भरणा केंद्राची संख्या कमी असल्याने वीज ग्राहकांची गैरसोय व्हायची.
महावितरणकडून वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल अ‍ॅप सुरू केल्यावर आॅनलाईन पैसे भरण्याचा कल वाढला. पण, वीजग्राहकांना पक्की पावती हवी असल्याने वीजग्राहकांची होणारी गैरसोय नवीन यंत्रणेमुळे दूर होण्यास मदत मिळणार आहे.
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करण्यासाठी जी मशीन वापरतात, अगदी तीच मशीन महावितरणने देवळी आणि खरांगणा उपविभागात वापरण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उपविभागांत प्रत्येकी ४-४ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांच्या घरी जनमित्र थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी गेल्यावर ग्राहकाने क्रेडिट अथवा डेबिट कार्ड मार्फत देयकाची भरणा करण्याची तयारी दाखवल्यास नवीन मशीनच्या माध्यमातून देयकाची भरणा करून तत्काळ थर्मल कागदावर रसीद देण्याची सोय करून दिली आहे. ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी केले आहे.
प्रत्येकी चार मशीन उपलब्ध
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करण्याकरिता जी मशीन वापरतात, तशीच मशीन महावितरणने देवळी आणि खरांगणा उपविभागात वापरण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही उपविभागाकरिता पत्येकी चार-चार यंते उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Web Title: Now the power consumers will get an instant receipt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.