कोरोनामुक्त वर्ध्यासाठी आता ‘अनलोडिंग पॉर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:00 AM2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:28+5:30

जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारे अनेकांच्या संपर्कात येताच त्यामुळे त्यांच्या माध्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून वर्धा शहराच्या दूर दत्तपूर शिवारात अनलोडिंग पॉर्इंट तयार करण्यात आला आहे. असेच अनलोडिंग पॉर्इंट जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी तयार करण्यात आले असून दत्तपूर शिवारातील अनलोडिंग पॉर्इंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केला.

Now 'Unloading Point' for Corona Free Wardha | कोरोनामुक्त वर्ध्यासाठी आता ‘अनलोडिंग पॉर्इंट’

कोरोनामुक्त वर्ध्यासाठी आता ‘अनलोडिंग पॉर्इंट’

Next
ठळक मुद्देआलू, कांदा, लसूण, अद्रकाच्या टंचाईवर मात : जिल्हा प्रशासनासह बाजार समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसून आणल्या जातो. ेया जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी ‘अनलोडिंग पॉर्इंट’ तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेली वाहने सॅनिटाईज करून त्यातील माल पूर्वी सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या मालवाहूत लादून त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना पुरवठा केल्या जाणार आहे.
दत्तपूर टि-पॉर्इंटवरील अनलोडिंग पॉर्इंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते करण्यात आला.
वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तेथील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांला लागणारा आलू, कांदा, लसून व अद्रक इतर जिल्ह्यातून येतो. या जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारे अनेकांच्या संपर्कात येताच त्यामुळे त्यांच्या माध्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून वर्धा शहराच्या दूर दत्तपूर शिवारात अनलोडिंग पॉर्इंट तयार करण्यात आला आहे. असेच अनलोडिंग पॉर्इंट जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी तयार करण्यात आले असून दत्तपूर शिवारातील अनलोडिंग पॉर्इंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तहसीलदार प्रिती डुडुलकर, जिल्हा मार्केटींग अधिकारी गौतम वालदे आदींची उपस्थिती होती. अनलोडिंग पॉर्इंटवर पहिल्या दिवशी एकूण १३ मोठ्या मालवाहूतील आलू, कांदा, लसून दक्षता घेत उतरविण्यात आला.

चालक राहतो भ्रमनध्वनीवर संपर्कात
आलू, कांदा, लसून व अद्रक घेऊन वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या मालवाहूचा चालक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाºयांच्या संपर्कात भ्रमनध्वनीवर राहतो. तो मालवाहू घेऊन वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करणार त्यावेळी त्याला अनलोडिंग पॉर्इंटचे स्थळ सांगण्यात येते. त्याठिकाणी तो पोहोचल्यावर त्याचे वाहन सॅनिटाईज केले जाते. शिवाय त्या मालवाहूत असलेल्या व्यक्तींना वेगळे ठेवले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसºया वाहनात हा माल लादून वर्ध्याच्या व्यापाºयांना वितरीत केला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी सांगितले.

कोरोना बाधित जिल्ह्यांमधून वर्धा जिल्ह्यात आलू, कांदे, लसून आणि अद्रकाची आयात होत. परंतु, या जीवनावश्यक वस्तूंसोबत कोरोनाची एन्ट्री वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर जिल्ह्यात तीन ठिकाणी अनलोडिंग पॉर्इंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून सदर जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेले वाहन सॅनिटाईज केले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसºया वाहनात हा माल लादून तो व्यापाºयांना दिला जातो. त्यांच्या माध्यमातून या मालाचा इतर व्यावसायिकांना पुरवठा होणार आहे. यामुळे जिल्हा कोरोनामुक्त रहाण्यासाठी फायदा होणार आहे. शिवाय आलू, कांदा, लसून व अद्रकाची जिल्ह्यात टंचाई निर्माण होणार नाही.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.

Web Title: Now 'Unloading Point' for Corona Free Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.