ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर, भारनियमनावर शेतकयांची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 04:41 PM2017-11-21T16:41:03+5:302017-11-21T16:41:29+5:30

कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली.

Now the use of tractor for the elite, the concept of farmers on the weightlines | ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर, भारनियमनावर शेतकयांची शक्कल

ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर, भारनियमनावर शेतकयांची शक्कल

googlenewsNext

वर्धा : कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली. घोराड येथे शेतक-यांनी ट्रॅक्टरचलित वीजनिर्मिती यंत्राचा वापर करून ओलित केले. यात वेळेची बचत होते असली तरी ओलिताचा खर्च मात्र वाढला आहे. 

ट्रॅक्टरचलित यंत्रावर ५, ३, ७.५ ते २ अश्वशक्ती मर्यादा असलेले विद्युतपंप कार्य करतात. यावर ६० स्प्रींकलरचे नोझलने सिंचन करता येते. कमी वेळात जास्त ओलित करणे शक्य होत आहे. दिवसाला ३ ते ४ एकरातील ओलित येथील शेतकरी करू लागला आहे. याकरिता शेतक-याला ५ हजार रुपए खर्च येतो. ज्या शेतक-याकडे स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर आहे त्याला दोन ते अडीच हजार रुपए खर्च येतो. हा सर्व खटाटोप करुन शेतकरी ओलित करीत असला तरी शेतक-यांना खर्च परवडणारा नाही. 

भारनियमनाचे वेळापत्रक गैरसोयीचे आहे. रात्रीचे ओलीत करताना शेतक-यांना अडचण येते. कधी ब्रेकडाऊन तर कधी वीज पुरवठा खंडित होतो. वारंवार खंडित होणा-या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे ओलिताकरीता दिलेली मजुरी वाया जाते. एकीकडे मजुरीचे वाढलेले दर आणि भारनियमनातील अनियमितता यामुळे  शेतक-यांनी हे यंत्र विकत घेतले, असे शेतकरी सांगतात. 

Web Title: Now the use of tractor for the elite, the concept of farmers on the weightlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.