महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सायकलयात्रा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 02:09 PM2020-10-10T14:09:29+5:302020-10-10T14:09:56+5:30

Mahatma Gandhi Sewagram, Wardha News माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाला सायकल यात्रेतून जनजागृती करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या आश्रमपासून अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी हिरवी झंडी दाखवून यात्रेला सकाळी ९.०० वा. प्रारंभ झाला.

On the occasion of the 151st birth anniversary of Mahatma Gandhi, a bicycle ride was started | महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सायकलयात्रा रवाना

महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सायकलयात्रा रवाना

Next
ठळक मुद्देसेवाग्राममधील आश्रमापासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाला सायकल यात्रेतून जनजागृती करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या आश्रमपासून अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी हिरवी झंडी दाखवून यात्रेला सकाळी ९.०० वा. प्रारंभ झाला.

यात्रेबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले जिल्ह्यात गांधीजींच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. राज्य,देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हिडच्या पाश्रर््वभूमीवर गांधीजींची जयंती योग्य ती खबरदारी घेऊन साजरी करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने समाज जागृतीचे काम व्यक्तीने माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून केली तर हा आजार नक्कीच संपणार. याची सुरूवात चांगल्या प्रकारे झाल्याने वर्धा जिलृह्याने आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. शेवटचा टप्प्यात जनजागृती रथ आणि सायकल यात्रेतून जनजागृती करण्यात येत आहे असे सांगितले. डॉ.सचिन पावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी यात्रेत सहभागींचे स्वागत करून सायकल यात्रेचा मार्ग व समारोपाबाबत माहिती दिली. प्रभू यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर यात्रा रवाना झाली. समोर जनजागृती रथातून माहिती देण्यात येत होती. आश्रमचे मंत्री मुकुंद मस्के, सदस्य आशा बोथ्रा, शोभा कवाडकर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असे १५ ते २०सायकल स्वार होते. जिल्हाधिकारी स्वत: सायकल यात्रेत सहभागी झाले होते.

Web Title: On the occasion of the 151st birth anniversary of Mahatma Gandhi, a bicycle ride was started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.