समुद्रपूरात पाणीटंचाई
By admin | Published: March 24, 2017 01:49 AM2017-03-24T01:49:58+5:302017-03-24T01:49:58+5:30
खड्डा खोदताना पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शहरात सुमारे तीन वॉर्डात पाणी....
महिलांची भटकंती : पाईपलाईन फुटली
समुद्रपूर : खड्डा खोदताना पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शहरात सुमारे तीन वॉर्डात पाणी न पोहोचल्याने महिलांना भटकंती करावी लागली. दुरूस्तीचे काम सुरू असले तरी किमान दोन दिवस लागणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
तहसीलचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यात जाहिरात फलकासाठी जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना नगर पंचायतच्या नळ योजनेचे पाईप फुटले. परिणामी, गुरूवारी तीन वॉर्डांत पिण्याचे पाणी पोहोचले नाही. न.पं. ने पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू केले; पण वेळ लागणार असल्याने शनिवारपर्यंत पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. पाईप फुटताच कंत्राटदार जेसीबीसह पसार झाले. विभागीय आयुक्तांचा दौरा असल्याने ही कामे सुरू आहे. तहसीलदार करंडे कामाची पाहणी करीत आहे. तहसील कार्यालयातील मैदानातून भालकर वॉर्ड क्र. ३, ४ व ५ ची पाईपलाईन गेली आहे. न.पं. प्रशासनाला न विचारता ही काम होत असल्याने वारंवार पाईप फुटत आहे. ही बाब कळताच न.पं. उपाध्यक्ष रवींद्र झाडे व सभापती राऊत यांनी त्वरीत दुरूस्ती सुरू केली.(तालुका प्रतिनिधी)
माजी सैनिक दहा वर्षांपासून पाण्याविना
आर्वी : खुबगाव येथील माजी सैनिक सुदाम सरोदे यांच्याकडे असलेल्या घरगुती नळयोजनेचा पाणी पुरवठा दहा वर्षांपासून बंद आहे. ग्रा.पं. ला विनंती करून व पाणी कर भरूनही त्यांचा पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी, त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत माजी सैनिकाने पं.स. गटविकास अधिकारी, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.