पंचायत राज समितीच्या दौऱ्याने अधिकारी, कर्मचारी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:43 AM2018-08-08T00:43:48+5:302018-08-08T00:44:32+5:30
राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे. बुधवार ८ रोजी सकाळी १० वाजता ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असून काही कामचुकार अधिकारी यामुळे धास्तावलेच आहेत.
जिल्ह्यातील विधीमंडळाच्या सदस्यांशी विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा ते करणार आहेत. त्यानंतर १०.३० ते ११ वाजता दरम्यान जि.प.च्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. सकाळी ११ वाजता सन २०१३-१४ लेखा परीक्षा पुनर्वविलोकन अहवालातील वर्धा जि.प.च्या संबंधी परिछेदसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. गुरुवार ९ आॅगस्टला समिती पंचायत समित्यांना भेट देणार आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रा.पं., पं.स.च्या गटविकास अधिकारी यांची झाडाझडतीच ते घेणार आहेत. १० आॅगस्टला जि.प.च्या सन २०१४-१५ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात जि.प.च्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे. असे असले तरी वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक हे सध्या संपावर आहेत. समितीच्या दौऱ्याच्या दिवशी ग्रामीण भागात शासकीय कार्यालय बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे समिती काय भूमिका घेते याकडे कर्मचाºयांचे लक्ष आहे.
दोन महिन्यांपासून तयारी सुरू
विधीमंडळाच्या विधान परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या समितीत सहभागी आहेत. ते जिल्ह्याच्या कोणत्या भागात दौर करतात याविषयी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता मागील दीड ते दोन महिन्यांपासून या समितीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मागील महिन्यात या समितीचा दौरा निश्चित झाला होता. मात्र, नागपूर अधिवेशनामुळे तो बारगळला. आता या समितीच्या आगमनाविषयी उत्सुकता आहे.
ग्रामपंचायतींची अस्वच्छता तपासा
ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सध्या केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवित असले तरी या पंचायत राज समितीने ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दौऱ्याच्यानिमित्ताने आढावा घ्यावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.