पदाधिकाऱ्यांंनी लसीकरणाची ओनरशिप घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:00 AM2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:10+5:30

१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यापूर्वीच लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस घेतल्यानंतर काही दिवसांत  कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याचे टोकाचे परिणाम होत नाही. लोकांना गंभीर होण्यापासून वाचविते. त्यामुळेच या लसीचे महत्त्व असून, या लसीबाबतचा गैरसमज टाळावा. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मोटारगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी देवळीकर यांनी दिली.

Officials should take ownership of vaccination | पदाधिकाऱ्यांंनी लसीकरणाची ओनरशिप घ्यावी

पदाधिकाऱ्यांंनी लसीकरणाची ओनरशिप घ्यावी

Next
ठळक मुद्देसुरेश बगळे : ६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी अभियान यशस्वी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक पालिकेचे पदाधिकारी तसेच सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ६० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी या कामाची जबाबदारीतून ओनरशिप घ्यावी, जनजागृती करावी तसेच त्यांना लसीकरणाच्या केंद्रापर्यंत आणून मदत करावी, असे विचार उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी व्यक्त केले. तहसील कार्यालयात  कोरोना लसीकरणाची बाजू मांडत असताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी विजय देवळीकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर ताम्हणकर, पालिकेचे उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, पवन महाजन, मारोती मरघाडे उपस्थित होते. शासकीय आकडेवारीनुसार कोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्यात ६० वर्षांवरील नागरिकांचा अधिक समावेश असल्याने या वयोगटातील लसीकरणावर भर देण्यात यावा,  ३१ मार्चपर्यंत या वयातील कोणतीही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी बगळे यांनी दिले. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यापूर्वीच लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस घेतल्यानंतर काही दिवसांत  कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याचे टोकाचे परिणाम होत नाही. लोकांना गंभीर होण्यापासून वाचविते. त्यामुळेच या लसीचे महत्त्व असून, या लसीबाबतचा गैरसमज टाळावा. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मोटारगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी देवळीकर यांनी दिली. बैठकीला प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, पंकज गावंडे, ज्ञानेश्वर जाधव, जनार्दन ढोक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार, संघर्ष  मोर्चाचे प्रवीण कात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची गती वाढवा
समुद्रपूर : जेष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वर्षाच्या विविध आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. ३१ मार्चपर्यंत लसीकरण करण्याच्या उद्देश्याने तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,नगरसेवक,स्वयंसेवक रासेयोचे स्वयंसेवक आदींनी समोर येऊन कोरोना लसीकरण बाबत जनजागृती करून जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करावे असे आवाहन तहसीलदार राजू रणवीर यांनी केले आहे लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व लसीकरणाचे प्रमाण वाढावे या दृष्टीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी तहसीलदार राजू रणवीर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी मार्गदर्शन केले या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना  म्हैसकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष वर्षा बाभुळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. मेघश्याम ढाकरे, आरोग्य विस्तार अधिकारी वानखेडे, शिवसेनेचे रवींद्र लढी, पंचायत समिती सदस्य गजानन पारखी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप डगवार,कांग्रेसचे विनोद हिवंज ,माजी उपाध्यक्ष रवींद्र झाडे माजी नगरसेवक मधु कामडी, प्रवीण चौधरी,पंकज बेलेकर, तारा अडवे, इंदू झाडे, सुषमा चिताडे,वनिता कांबळे ,दिनेश निखाडे, आशा वासनिक, प्रफुल्ल महंतारे, नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी धुमाळे उपस्थित होते .
 

सरपंचांचा लसीकरणासाठी पुढाकार
आष्टी(शहीद) : कोरोनाने थैमान घातल्याने शासन निर्देशाप्रमाणे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता सुजातपूर येथील सरपंच प्रवीण ठाकरे यांनी स्वखर्चाने लसीकरणाचा कार्यक्रम पार पाडला. खासगी गाड्या करून गावातील ५५ नागरिकांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत लसीकरण केले. तर ग्रामपंचायतीमध्ये कोविड तपासणीकरिता शिबिराचे आयोजन केले. यामध्ये १७० नागरिकांनी चाचणी केली. या उपक्रमाचे तहसीलदारांनी कौतुक केले. सुजातपूर ग्रामपंचायतीअंतर्गत कोरोना लसीकरणासाठी गावातून आष्टीला जाण्यासाठी शेतकरी, शेतमजूर यांना दिवसभर वेळ काढून जावे लागत असल्यामुळे व मजुरी पडत असल्याने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सरपंच प्रवीण ठाकरे यांनी ग्रामस्थांना मोफत लस देण्यासाठी कार्यक्रम आखला.  त्यानुसार दोन्ही कार्यक्रम पार पाडले. ग्रामपंचायतीमध्ये कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार आशिष वानखडे, नायब तहसीलदार रणजित देशमुख यांनी केले. या वेळी मंडळ अधिकारी अनिल जगताप, सरपंच प्रवीण ठाकरे,  ग्रामसेवक राजू जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता तुमडाम,  डॉ. पल्लवी बुटले, शिक्षक मंगेश अतकरणे, राजेराम दारोकर, अंगणवाडी सेविका पुष्पा गवळीकर, आशा वर्कर रेखा निकाळजे, प्रियंका भोस आदी उपस्थित होते. या वेळी सुजातपूर गावातील एकूण १७० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  ६० वर्षांवरील एकूण ५५ नागरिकांना लसीकरणासाठी नेण्यात आले. उपक्रम स्वखर्चाने राबविल्यामुळे सरपंच ठाकरे यांचे तहसीलदारांनी कौतुक केले. 

कोरोना लसीकरणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

सेवाग्राम : कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे.यात मृत्यूचे प्रमाणही वाढतांना दिसून येत आहे. खबरदारी,नियमांचे पालन आणि सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन दवंडी आणि वाहनांची व्यवस्था केली आहे. हमदापूरच्या पुढे उमरा गाव असून या ग्रामपंचायत अंतर्गत वायगांव बैलमारे गाव आहे. हे गाव मांडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येते. लस घेण्यास अनेक कारणे व अडचणी वयोवृध्दांनी सांगितल्या. अनेकांनी भीती व्यक्त केली. सरपंच उमेश चौधरी, उपसरपंच प्रीती माटे, सचिव विनोद महाराष्ट्र, हंसा चौधरी, वर्षा जवादे यांनी बैठक घेऊन एक वाहन भाडे तत्त्वावर घेऊन जेष्ठांना लसीकरणाकरिता  मांडगांव येथे नेण्यात आले. या सुविधेमुळे ग्रामपंचायत अंतर्गत गावातील १०० टक्के लसीकरण होणार आहे. शुक्रवारला तेरा लाभार्थिंनी लस घेतली.सेवाग्राम ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत, सचिव वासुदेव रोहनकर, सदस्य सुशिल कोल्हे, मुन्ना शेख, दिनेश गणवीर, आशा सेविका नलिनी ओंकार, रंजना भोयर, डोंगरे, पूनम भोंगाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शंभर टक्के रहिवाशांचे लसीकरण झाले पाहिजे, यावर विचार विनिमय झाला. गावात साठच्यावरील नागरिकांनी कस्तुरबा रूग्नालयात जाऊन लस घ्यावी. नंतर शासन-जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे नागरिकांनी लस घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन दवंडीतून करण्यात आले.  

 

Web Title: Officials should take ownership of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.