सूर नदीवर पोहोचले अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:12 PM2018-12-20T22:12:19+5:302018-12-20T22:12:54+5:30
सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता. अखेर तक्रारी व निवेदनाचा ओघ वाढतच गेला. त्याला लोमकतने वाचा फोडल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेत पंचनामा केला.
मागील वर्षभरापासून सूर नदीला रेती चोरट्यांनी लक्ष केले होते. दिवसरात्र या नदीवरुन चोरटी वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत लोकमतने सलग वृत्ताच्या माध्यमातून वाचा फोडली. त्यामुळे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी रेती जप्त करून ती तहसील कार्यालयात जमा केली होती; पण कुणावरही कारवाई केली नसल्याने कारवाईचा वचक राहिला नाही. त्या कारवार्ईत रेती, चाळण्या, घमेले, फावडे जप्त करण्यातच महसूल विभागाने धन्यता मानली. महसूल विभागातील अधिकाºयांचे रेती चोरट्यांसोबत मिलीभगत असल्याने ते कारवाईचा केवळ दिखावा करुन दंड ठोठावून सोडून देतात. त्यामुळे रेती माफीयाही निर्ढावले आहे. अधिकाºयांचा धाक राहिला नसल्याने या नदीपात्राला पोखरण्याचे काम सुरुच होते. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. तेव्हा महसूल यंत्रणेला जाग आली. अखेर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
नदीपात्रातील रेती केली जप्त; पण कारवाई कुणावर होणार?
सूर नदीवर गुरुवारला सकाळी मंडळ अधिकारी उईके यांनी सहकाºयांसह धडक केली. तेव्हा नदीपात्रात रेतीचे ढिग आढळून आले. त्यांनी पंचनामा करीत हे रेतीचे ढिग जप्त केले. पण, आता यासंदर्भात कारवाई कोणावर होणार? याचे उत्तर देण्यासाठी अधिकारी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे ही कारवाई फक्त कागदोपत्रीच तर राहणार नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे.
मोझरी परिसरातून रेतीची अवैध वाहतूक
मोझरी (शेकापूर) परिसरातील नाल्यांवरून पावसाळा संपला तोच नदीचे पाणी कमी झाल्याबरोबर वाळूमाफीयांचा नजरा रेतीवर पडल्या. गेल्या काही दिवसांपासून येथून ३ कि़मी. अंतरावर असलेल्या वर्धा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतुक सुरू आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासनाला लाखोंचा मिळणारा महसूल हे रेतीचोर लांबवत आहे. सध्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात रेतीघाट बंद असल्यामुळे तसेच नवीन रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने चढ्या भावाने रेती विकत असल्याचे दिसते. मोझरी परिसरातील झगळी शिवारातून पांदन रस्त्याने तसेच काही शेतकºयांच्या शेतातून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक सुरू आहे. या चोरट्या वाहतूकीला प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.