शहरात तब्बल ७४ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:31 AM2017-07-27T02:31:05+5:302017-07-27T02:31:33+5:30

पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागल्याची बरीच उदाहरणे आहेत.

Old Buildings | शहरात तब्बल ७४ इमारती धोकादायक

शहरात तब्बल ७४ इमारती धोकादायक

Next
ठळक मुद्दे मोठ्या अपघाताचा धोका : वर्धा नगर पालिकेने बजावले नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागल्याची बरीच उदाहरणे आहेत. मंगळवारी मुंबई येथे इमारत कोसळल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले. वर्धा शहरातही तब्बल ७४ इमारती जीर्ण अवस्थेत असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत सदर शिकस्त इमारत मालकांना नगर परिषदेने नोटीस बजावले आहेत. काहींनी नोटीसचा खुलासाही सादर केला आहे.
पावसाळ्यापूर्वी नियोजन कार्यात वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाकडून शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला शहरात तब्बल ७४ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. यावरून पालिकेच्या बांधकाम विभागाने पुढाकार घेत संभाव्य धोका लक्षात घेत सदर इमारत मालकांना १५ जून २०१७ रोजी नोटीस जारी केले. सदर जीर्ण इमारती सात दिवसांच्या आत खाली करून ती पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय सूचनांचे पालन न केल्यास महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये कार्यवाहीस पात्र ठराल, अशी तंबीही देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर शिकस्त इमारती पालिकेच्यावतीने पाडून त्याकरिता लागलेला खर्च इमारत मालकाकडून वसूल करण्यात येईल, असेही इमारत मालकांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते.
यातील नोटीस प्राप्त इमारत मालकांपैकी बोटावर मोजण्याइतपत इमारत मालकांनीच नोटीसवर खुलासा सादर केला आहे. यामुळे इतर इमारत मालकांना पालिकेच्या नोटीसचे गांभीर्य कळले नसल्याचेच दिसून येत आहे. न.प. प्रशासनाकडून शहरातील धोकादायक इमारत मालकांना नोटीसद्वारे दिलेली मुदतही संपुष्टात आली आहे. यामुळे पालिका प्रशासन पूढील कार्यवाही करणार असून त्यासाठी नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी पावसाळा सुरू असल्याने शिकस्त इमारत कोसळून प्राणहानी होण्याची शक्यता मात्र कायम आहे.

दहा घरमालकांनी सादर केला खुलासा
नगर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या पथकाने सर्वेक्षण केले. यात ७४ इमारत मालकांना त्यांच्या मालकीच्या इमारती शिकस्त असल्याने नोटीस बजावले आहेत. ७४ पैकी केवळ १० इमारत मालकांनी आतापर्यंत पालिकेला खुलासा सादर केला असून उर्वरित ६४ मालक याबाबत गंभीर नसल्यसाचेच दिसून आले.

सहा प्रकरणे न्यायप्रविष्ट
इमारतीचा वाद असल्याने तसेच इमारत मालक आणि इमारतीत अनधिकृतपणे राहणाºयांचे वाद आहेत. याबाबतची काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या ७४ इमारत मालकांपैकी सहा इमारत मालकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्या प्रकरणांत कार्यवाही कठीण आहे.

पालिकेच्यावतीने शहरातील ७४ जणांना इमारत शिकस्त असल्याबाबत नोटीस बजावण्यात आले आहेत. काहींनी खुलासा सादर केला आहे तर काहींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. बहुतांश शिकस्त इमारतींमध्ये इमारत मालक राहत नसून तेथे सध्या भाडेकरी वास्तव्यास आहेत. यामुळे कार्यवाही करणे कठीण झाले आहे.
- किशोर साखरकर, प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा.

नोटीस बजावण्यात आलेल्या इमारत मालकांपैकी काहींची वादाची प्रकरणे न्यायालयात न्यायदानासाठी बºयाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे पालिकेला प्रभावी कार्यवाही करताना अडचणी निर्माण होत आहेत.
- सुधीर फरसोले, नगर अभियंता, न.प. वर्धा.
 

Web Title: Old Buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.