वादळाने वृद्ध दाम्पत्य उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:45 PM2019-06-13T23:45:05+5:302019-06-13T23:45:34+5:30
वर्धा तालुक्यातील निमगाव (सबाने) या गावाला वादळाचा तीन ते चार दिवस फटका बसला. निमगाव (सबाने) येथील कर्णबधीर असलेले नारायण विठोबा पेंदोर (६५) व आंधळी असलेली आशा नारायण पेंदोर (६०) या वृध्द दाम्पत्यावर वादळामुळे संकट कोसळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील निमगाव (सबाने) या गावाला वादळाचा तीन ते चार दिवस फटका बसला. निमगाव (सबाने) येथील कर्णबधीर असलेले नारायण विठोबा पेंदोर (६५) व आंधळी असलेली आशा नारायण पेंदोर (६०) या वृध्द दाम्पत्यावर वादळामुळे संकट कोसळले आहे. त्यांचे घर पूर्णत: भुईसपाट झाले. हल्ली यांचा संसार उघड्यावरच असल्याचे दिसून येते.
यांना आतापर्यंत कुठलीही आर्थीक मदत मिळाली नाही. त्यांचे मकान भुईसपाट झाले आहे. नारायण कसे तरी मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. यांना तीन मुली होत्या. परंतु तीनही मुलींचा विवाह झाल्यामुळे त्या त्यांच्या सासरी आहेत. यामुळे हे वृध्द दाम्पत्य कसातरी उदरनिर्वाह करीत आहे. वादळाच्या तडाख्यामुळे बरेच कुटंूब उघड्यावर आलेत तर शेतकऱ्यांचे शेतमालांचे सुध्दा नुकसान झालेत. परंतु निमगाव (सबाने) गावाला लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही.
त्यामुळे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळते किंवा नाही याबाबत साशंकता दिसून येत आहे. घर कोसळल्यामुळे संकटात आलेल्या पेंदोर यांच्या डोळयाचा उपचार लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
पेंदोर यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे यांच्याकडे आशा यांच्या डोळ्यांचा उपचार करण्याकरिता पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही लोकवर्गणी करून त्यांच्या डोळ्यांचा उपचार करणार आहेत.
- गंगाधर मसराम, सामाजिक कार्यकर्ते निमगाव (सबाने).