नवीन नळयोजनेला जुन्या जलकुंभाचा आधार

By admin | Published: May 6, 2017 12:39 AM2017-05-06T00:39:14+5:302017-05-06T00:39:14+5:30

नजीकच्या घोराड येथे १.७५ कोटीची नळयोजना कार्यान्वित झाली आहे. या नवीन नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना

Old hydrocephalic base for new tubes | नवीन नळयोजनेला जुन्या जलकुंभाचा आधार

नवीन नळयोजनेला जुन्या जलकुंभाचा आधार

Next

१.७५ कोटीचा निधी : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
सेलू : नजीकच्या घोराड येथे १.७५ कोटीची नळयोजना कार्यान्वित झाली आहे. या नवीन नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी दोन नवीन जलकुंभ बांधण्यात आले असताना ४२ वर्ष जुन्या जलकुंभाचा आधार घ्यावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे.
सेलू तालुक्यात सर्वप्रथम घोराड येथे १९७४-७५ मध्ये नळयोजना कार्यान्वित झाली. त्यावेळी सदर आराखड्यात एक जलकुंभ, जलवाहिन्या, दोन विहिरीचा समावेश होता. त्यानंतर गावाचा वाढता विस्तार बघता या नळयोजनेला केजाजीनगर मधील विहिरीचा आधार देत नव्याने ेएका जलकुंभाचे बांधकाम झाले; पण १९७४ मध्ये टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे गत दोन वर्षांपूर्वी घोराडला १.७५ कोटीची नळ योजना मंजूर झाली. त्या योनजेचे काम पूर्णत्त्वाकडे आहे. यात एक विहिर, दोन जलकुंभ व गावात जलवाहिन्या मंजूर झाल्या. हे काम पूर्ण झाले असून गावाला पाणी पुरवठा सुरू झाला. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून नळावर मीटरही लावण्यात आले. मिटरचे रिडींग घेण्याचे कामालाही सुरू झाले आहे. परंतु, संपूर्ण नळयोजना नव्या स्वरूपात झाली असताना ४२ वर्ष जुन्या जलकुंभाचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे सदर विषय सध्या गावात चर्चेचा विषय ठरत आहे. १९७३-७४ मध्ये बांधण्यात आलेल्या जलकुंभाची मुदत संपली की संपायची आहे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून जलकुंभाच्याकाही भागाच्या लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहे. त्यामुळे विविध प्रश्न नागरिकांकरवी उपस्थित केले जात आहे. पाणी पुरवठा विभागाला आराखडा तयार करताना किती पाणी या गावाला लागेल, त्यासाठी किती क्षमतेचे किती जलकुंभ आवश्यक आहे. याचा विचार आराखडा तयार करताना होणे क्रमप्राप्त होते. परंतु, जुनं त सोनं अस म्हणत ४२ वर्ष जुन्या जलकुंभाचा नव्या नळ योजनेसाठी आधार घेतला जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)

तालुक्यातील पहिली नळ योजना
१९७५ मध्ये तत्कालीन सरपंच शंकर खोपडे यांच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री प्रभा राव याच्या हस्ते तालुक्यातील पहिल्या नळयोजनेचे घोराड येथे लोकार्पण झाले होते. सदर नळ योजनेला ४२ वर्ष होत आहे. तत्कालीन परिस्थितीतील ही तालुक्यातील पहिली नळ योजना आहे.

त्या जलकुंभाची स्थिती चांगली असल्यामुळे नवीन नळ योजनेकरिता तो जलकुंभ घेण्यास काहीही वावगे नाही. तो किती वर्ष जुना आहे हे महत्त्वाचे आहे.
- विलास काळबांडे
अभियंता, पाणीपुरवठा विभाग जि.प. वर्धा.

Web Title: Old hydrocephalic base for new tubes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.