जुन्या वादातून युवकाची हत्या

By admin | Published: July 1, 2014 01:37 AM2014-07-01T01:37:39+5:302014-07-01T01:37:39+5:30

जुन्या वादातून युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शांतीनगर चौक परिसरात उघड झाली. विकेश उर्फ विक्की अरुण डंभारे

Old man's murder | जुन्या वादातून युवकाची हत्या

जुन्या वादातून युवकाची हत्या

Next

आरोपी फरार: सिंदी (मेघे) येथील थरार
वर्धा : जुन्या वादातून युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शांतीनगर चौक परिसरात उघड झाली. विकेश उर्फ विक्की अरुण डंभारे रा. उमरी रोड सिंदी (मेघे) असे मृतकाचे नाव आहे. हत्या नेमकी कुणी केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शांतीनगर चौकात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पाहणी केली असता युवकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. मृतदेहाची पाहणी केली असता तो परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध घेतला असता त्याचे नाव विकेश डंभारे असे असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता पाठविला.
या प्रकरणी मृतकाचा भाऊ सुमेध डंभारे याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत विकेश डंभारे हा त्याच्या शेजारी राहत असलेल्या दिनेश पाटील याच्या पत्नीशी मध्यंतरी बोलत होता. या कारणावरून या दोघांत पुन्हा काल वाद झाला. हा वाद शाब्दीक होता. सायंकाळी तो वाद आटोक्यात आल्याचे साऱ्यांना वाटत होते.
अशात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास दिनेश पाटील विकेशच्या घरी आला. त्याने विकेशला बाहेर येण्याचे सांगितले. तो बाहेर आल्यावर दिनेश त्याला दुचाकीवर बसवून घेवून गेला. तो रात्री परत आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. अशात सकाळी ७ वाजता शांतीनगर चौकात त्याचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याच्या तक्रारीवरून दिनेश पाटील व त्याचा भाऊ विनोद पाटील याच्यावर भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींच्या शोधात सेवाग्राम पोलीस फिरत असून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे; मात्र त्याची माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत.(प्रतिनिधी)

Web Title: Old man's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.