जुन्या भांडणातून वर्ध्यातील युवकाची चंद्रपुरात निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 04:16 PM2018-11-28T16:16:34+5:302018-11-28T16:19:06+5:30

मानलेल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकाचा काटा काढण्याच्या इराद्याने चंद्रपूर जिल्ह्यातील युवकाने वर्ध्यातील युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

The old quarrel caused a young man's death in Chandrapur | जुन्या भांडणातून वर्ध्यातील युवकाची चंद्रपुरात निर्घृण हत्या

जुन्या भांडणातून वर्ध्यातील युवकाची चंद्रपुरात निर्घृण हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमानलेल्या बहिणीसोबतच्या संबंधांमुळे आले वितुष्टक्रौर्याची परिसीमागळा आवळल्यानंतर दगडाने केला प्रहार नंतर मृतदेह पेटवला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मानलेल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकाचा काटा काढण्याच्या इराद्याने चंद्रपूर जिल्ह्यातील युवकाने वर्ध्यातील युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या कृत्यात सूरज रामभाऊ आत्राम (४२) रा. चंद्रपूर याने वर्ध्याच्या गुड्डू उर्फ पुरुषोत्तम बाबाराव कदम (३७ ) याची १० आॅक्टोबर रोजी हत्या केली. त्याने गुड्डूची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केले. एवढेच नाही तर त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला.
या संपूण घटनाक्रमाची पार्श्वभूमी अशी की, सूरजच्या मानलेल्या बहिणीसोबत गुड्डूचे अनैतिक संबंध होते. याची कल्पना सूरजला नव्हती. काही कारणास्तव सूरज वर्ध्यात आल्यानंतर त्याला ही माहिती मिळाली. दरम्यान गुड्डूने सूरज व सदर महिलेला मारहाणही केली. या घटनेचा वचपा काढण्याची संधी सूरज शोधत होता. आॅक्टोबरच्या सुरुवातीला ही महिला चंद्रपूरला जात असल्याचे गुड्डूला कळल्याने तोही तिच्या मागे बल्लारशाहला गेला. याचवेळी सूरजने त्याला दारु पिण्याच्या निमित्ताने जंगलात नेऊन त्याचा काटा काढला.
गुड्डू परत न आल्याने त्याच्या आईने तो हरवल्याची तक्रार २२ आॅक्टोबर रोजी पोलिसांत दिली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वळता झाल्यानंतर तपासकामाला वेग आला. पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले व बोलते केले. त्यानंतर हे भयानक हत्याप्रकरण समोर आले. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात २२ आॅक्टोबरला दाखल मिसिंगच्या तक्रारीचा तपास आमच्याकडे वळता झाला. त्या प्रकरणी खात्रिदायक माहितीच्या आधारे चंद्रपूर गाठून अधिकची माहिती मिळविल्यावर गुड्डू उर्फ पुरुषोत्तम कदम याची हत्या झाल्याचे पुढे आले आहे. मृतक व आरोपीच्या बहिणीचे मागील दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपीने गुड्डूची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सुरज आत्राम याला अटक करण्यात आली आहे.
- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. वर्धा.

Web Title: The old quarrel caused a young man's death in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.