एक दिवस... दोन हत्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:04 AM2018-08-25T00:04:21+5:302018-08-25T00:04:47+5:30

शहरातील आनंदनगर परिसरात गांजा विक्रेत्याची भोसकून तर एकुर्ली येथे पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना शुक्रवारी एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक आनंदनगर येथील मृताचे नाव मिलिंद सुभाष मेश्राम (५१) आहे.

One day ... killing two ... | एक दिवस... दोन हत्या...

एक दिवस... दोन हत्या...

Next
ठळक मुद्देशहरातील आनंदनगरात गांजा विक्रेत्याला भोसकले : एकुर्लीत पत्नीचा आवळला गळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील आनंदनगर परिसरात गांजा विक्रेत्याची भोसकून तर एकुर्ली येथे पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना शुक्रवारी एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक आनंदनगर येथील मृताचे नाव मिलिंद सुभाष मेश्राम (५१) आहे. तर एकु र्ली येथील मृतक महिलेचे नाव कल्पना कैलास खोंड (३५) असे आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मिलिंद मेश्राम हा जुना गांजा विक्रेता होता. तो गांजाची वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्याला विशाखापट्टनम् येथील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याने सुमारे १८ महिन्यांचा कारावास नुकताच भोगला होता. त्यानंतर वर्धेत परतलेल्या मिलिंदने सदर अवैध व्यवसायाला हात जोडत रेल्वे गाड्यांमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिलिंद हा त्याच्या घरी एकटा असल्याचे हेरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यातच तो जागीच गतप्राण झाला.आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह मिलिंदच्या घराशेजारी असलेल्या निर्माणाधिन घराच्या आवारात शौचालयासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यात फेकून घटनास्थळावरून पळ काढला. सकाळी ही घटना निदर्शनास येताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने, पोलीस उपनिरीक्षक बोरखेडे, निलेश खेकारे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मिलिंदचा मृतदेह शौचालयाच्या टाक्याबाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सदर प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी चौकशीसाठी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने करीत आहेत.

मृताच्या शरीरावर ३१ गंभीर जखमा
अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून मिलिंद मेश्राम याची हत्या केली. मृतक मिलिंद याच्या शरीरावर आरोपीने धारदार शस्त्राने चक्क ३१ वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आहे आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह शौचालयासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यात फेकुन दिला.

अन् अल्पावधीतच घरातील रक्ताचा सडा स्वच्छ
घटनेच्यावेळी मिलिंद हा घरात एकटाच होता. याच आनंदनगर परिसरात मध्यरात्री २ वाजेपर्यंत वर्धा शहर पोलिसांची चमू गस्तीवर होती. त्यावेळीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही; पण सकाळी मिलिंद मेश्राम याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह शौचालयासाठी तयार केलेल्या टाक्यात फेकुन दिला. इतक्यावर तो थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने तब्बल ३१ वार केले रक्ताने माखलेले ते घर अल्पावधीतच स्वच्छ करून तेथून पोबारा केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

दोन दिवसांपूर्वी आला होता शहर पोलीस कचेरीत
मृतक मिलिंद मेश्राम हा त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सोबत घेऊन त्याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सुमारे दोन दिवसांपूर्वी आला होता. परंतु, त्यावेळी काही कारणास्तव पोलिसात तक्रार देण्यात आली नाही. त्यानंतर दोघेही घरी परतले. दरम्यान आज मिलिंदचा मृतदेह त्याच्या घराच्या आवारात आढळून आला.

Web Title: One day ... killing two ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.