एकाच दिवशी ४२ शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:08 PM2018-08-20T23:08:06+5:302018-08-20T23:09:36+5:30
शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली. याला नियमाप्रमाणे निकाली काढायला ४ महिन्याचा अवधी लागणार होता. मात्र त्यांनी प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबवित थेट गावातच दरबार भरविला.
मोई येथे वन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. गावातील एकापाठोपाठ ४२ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी दिल्या. वनविभागात तक्रारी येताच वनाधिकारी अमोल चौधरी यांनी वनरक्षक, वनपाल, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहाय्यक या सर्वांना सोबत घेवून मोई ग्रामपंचायतच्या आवारात दरबार भरविला. थेट सर्व शेतकºयांना बोलावून शेतातील नुकसानिची पाहणी करून पंचनाम तयार केले त्यावर सर्वांच्या सह्या झाल्या. आर्थिक नुकसान जागेवरच मंजुर केले. या आदर्श कार्यतत्पर कामामुळे मोईच्या सरपंच पद्मा कुसराम, उपसरपंच किसन चव्हान यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वनाधिकारी चौधरी यांचे आभार मानले. एकूण ४२ प्रकरण मंजुरी करेपर्यंत किमान चार महिने कालावधी गेला असता. मात्र प्रशासन कार्यशील असले पाहिजे याची जाणीव चौधरी यांनी ठेवल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम तात्काळ मिळण्यास मदत झाली आहे. तालुक्यातील मोई गाव जंगलाशेजारी आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
शेतीपिकांचे झालेले नुकसान दावे तात्काळ निघाली पाहिजे एवढाच उद्देश ठेवत प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबविला.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).