दोन अपघातात एक ठार; पाच गंभीर

By Admin | Published: April 16, 2017 12:54 AM2017-04-16T00:54:57+5:302017-04-16T00:54:57+5:30

भरधाव टॅ्रव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

One killed in two accidents; Five serious | दोन अपघातात एक ठार; पाच गंभीर

दोन अपघातात एक ठार; पाच गंभीर

googlenewsNext

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
देवळी : भरधाव टॅ्रव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. देवळीतील नांदोरा मार्गावरील सुलभ शौचालयाजवळ शनिवारी दुपारी हा अपघात झाला.
सचिन शंकर येळणे (३६) रा. देवळी असे मृतकाचे नाव आहे. तर मोहन लोंढे (२५) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीस सुत्रानुसार, एमएच-२९ ए. डब्ल्यु ४३९९ ही टॅ्रव्हल्स यवतमाळकडे भरधाव जात होती. याच दरम्यान गावातील रस्त्यावरुन यवतमाळ मार्गावर येणाऱ्या एमएच-३२ एस-९८२२ या दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक देवून ३० फुटपर्यंत ओढत नेले. अपघातात दुचाकीवरील सचिन येळणे हा खाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाला तर मोहन लोंढे गंभीर जखमी झाला.
अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स नाझीम खान पठाण रा. वर्धा यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालकाने पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

टॅ्रव्हल्स व ट्रेलरचा अपघात
केळझर : वर्धा- नागपूर महामार्गावर जंगलापूर शिवारात ट्रॅव्हल्स आणि ट्रेलर यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅव्हल्स चालकासह १४ प्रवासी जखमी झाले. सदर अपघात शनिवारी दुपारी घडला.
अंकिता सुनील हिवरे (१५) रा. पवनार, सोनाली मारोतराव डुकरे (२३) रा. हिंंगणघाट, संजय मारोती नाईक (४२) रा. आलोडी वर्धा अशी जखमीची नावे आहेत तर गंभीर जखमी असलेल्या टॅ्रव्हल्स चालकासह इतर किरकोळ जखमी प्रवाशांची नावे मात्र कळू शकली नाहीत.
नागपूरकडून वर्धेकडे जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३२ क्यू. २१२६ आणि विरुद्ध दिशेने येणारा ट्रेलर क्र. सी.जी.-०४ जी ७९६७ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅव्हल्स चालकासह तीन प्रवासी जबर जखमी झालेत तर दहा प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन सोडून पसार झाला. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही कडेला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक तपास सेलूचे ठाणेदार संजय बोथे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक तकित, राजेंद्र डाखोळे आणि चमू करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: One killed in two accidents; Five serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.