एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी केला हातसाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:00 AM2021-12-20T05:00:00+5:302021-12-20T05:00:17+5:30

चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक १ मधील लोहार चौकातील उमेश मख यांचे स्टेशनरी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील पाच हजार रुपये रोख तसेच काही साहित्य चोरून नेले. तर चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक ३ मधील आझाद चौकातील शिक्षक अतुल होले यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी व लाकडी कपाटातून १० ग्रॅमची सोन्याची पोथ, ३ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची अंगठी, राणी छाप चांदीचे पैसे तसेच ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल चोरून नेला.

In one night, thieves cleaned three places | एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी केला हातसाफ

एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी केला हातसाफ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
आष्टी (शहीद) : नजीकच्या लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनांमुळे लहान आर्वीसह परिसरात चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक १ मधील लोहार चौकातील उमेश मख यांचे स्टेशनरी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील पाच हजार रुपये रोख तसेच काही साहित्य चोरून नेले. तर चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक ३ मधील आझाद चौकातील शिक्षक अतुल होले यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी व लाकडी कपाटातून १० ग्रॅमची सोन्याची पोथ, ३ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची अंगठी, राणी छाप चांदीचे पैसे तसेच ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. अतुल होले हे शिक्षक असून ते यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे राहत असल्याने घर कुलूपबंद होते. याच कुलूपबंद घराला चोरट्याने टार्गेट केले. तसेच चोरट्यांनी नारायण घाटोळ यांच्या किराणा दुकानाचे शटरचे तोडून दुकानात शिरले. दरम्यान घाटोळे यांच्या शेजारी राहणारे सुभाष  होले हे लघुशंकेसाठी उठल्याने व चोरट्यांना कुणी तरी जागे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. गावात तब्बल तीन ठिकाणी चोरी झाल्याचे सकाळी लक्षात येताच पोलीस पाटील देवानंद पाटील यांनी आष्टी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: In one night, thieves cleaned three places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर