मारहाणप्रकरणी दोघांना तर छेडखानीत एकाला दंड
By admin | Published: May 8, 2014 11:58 PM2014-05-08T23:58:59+5:302014-05-08T23:58:59+5:30
वर्धा : इसमास मारहाण तसेच महिलेस शस्त्र लागल्याप्रकरणी दोन जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली. तिसरे न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश अमर काळे यांनी दिला.
वर्धा : इसमास मारहाण तसेच महिलेस शस्त्र लागल्याप्रकरणी दोन जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली. तिसरे न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश अमर काळे यांनी दिला. देवळी तालुक्यातील गौैळ येथील सवीता मडावी, राजू मडावी हे कुटुंबियांसह २१ मे २०१० रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास देवळीकडे जाण्यासाठी गौळच्या बसस्थानकावर उभे होते.
दरम्यान आॅटोचालक अमोल चौधरी व आॅटोमध्येच असलेल्या मिलिंद कुंभरे तेथे आले. तेथे प्रवास भाड्यावरून वाद झाल्यानंतर आॅटोचालक व त्याचा सहकारी चकरा मारत होते़ याबाबत हटकले असता अमोल चौधरी याने चाकू उगारून राजू मडावी याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सवीता मडावी मधे आल्याने त्यांना चाकू लागून जखमी झाल्या. यावेळी अमोल चौधरी व सहकारी मिलिंद कुंभरे या दोघांनी राजू मडावी यांनाही मारहाण करून पळ काढला. याबाबतच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सहायक पोलीस निरीक्षाक संजय कापसे यांनी तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रकरण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग तिसरे न्यायालयाचे न्यायाधीश अमर काळे यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद व साक्ष पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी अमर चौधरी व मिलिंद कुंभरे या दोघांना कलम ३२४, ३२३, ३४ अन्वये प्रत्येकी ६ हजार रुपये दंड तसेच एक दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ७ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. दीपाली गेडाम यांनी युक्तीवाद केला.(कार्यालय प्रतिनिधी)