एक हजार शेतकऱ्यांनी पाठविले राष्ट्रपतींना पत्र
By admin | Published: April 18, 2015 01:53 AM2015-04-18T01:53:46+5:302015-04-18T01:53:46+5:30
भाजप सरकारने नव्याने लागू केलेला शेतकरी विरोधी भूमि अधिग्रहण कायदा रद्द करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण लागू करावा, ...
वर्धा : भाजप सरकारने नव्याने लागू केलेला शेतकरी विरोधी भूमि अधिग्रहण कायदा रद्द करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण लागू करावा, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने एक हजार शेतकरी तथा नागरिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठविले़
केंद्र सरकारने सत्तेत येताच उद्योजकांचे हित जोपासत शेतकरी विरोधी भूमिअधिग्रहण कायदा लादला आहे़ या कायद्यात शेतकऱ्यांना विचारात न घेता त्यांचा शेतीवरील हक्कही काढून घेण्यात आला आहे. याचा विरोध म्हणून देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात ही मोहीम राबविण्यात आली़
या मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कल नुसार विविध ठिकाणी शेतकरी तसेच नागरिकांच्या बैठकी घेऊन भाजप सरकारने लादलेला भूमिअधिग्रहण कायदा आणि संयुक्त पुरोगामी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण कायदा यातील तफावत त्यांच्या निदर्शनास आणून देत नव्याने भाजप सरकारने लादलेला हा कायदा करण्यात यावा या मागणीची जवळपास एक हजार पत्रे उपस्थित शेतकरी तसेच नागरिकांनी राष्ट्रपतीच्या नावे लिहून दिली. सदर पत्रे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात आली. या मोहिमेत युवक काँग्रेस देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विपीन राऊत, प्रभारी तथा लोकसभा महासचिव सुधीर वसू, देवळी-पुलगाव गोविंद दय्या, अजय देशमुख, चंदू वाणी, अरूण लाहोरे, मोहन नावाडे, प्रवीण डडमल, सोनू गावंडे, निलेश ज्योत, राहुल सुरकार, वैद्य, यांचा सहभाग आहे.(शहर प्रतिनिधी)