नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:32 PM2019-04-16T21:32:07+5:302019-04-16T21:32:31+5:30

एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

One time water is available for nine years | नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

Next
ठळक मुद्देपावणेदोन कोटींच्या नळयोजनेनंतरही परिस्थिती गंभीर

विजय माहूरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसांतून एक वेळा पाणी पुरवठा करणे हे मागील नऊ वर्षांपासून सूरू आहे.
तालुक्यात प्रथम नळयोजना घोराड गावात तत्कालीन सरपंच शंकरराव खोपडे यांनी आणली. या नळयोजनेचे काम १९७४ साली पूर्ण झाले. शिवाय तत्कालीन पालकमंत्री प्रभा राव यांच्या उपस्थितीत १९७५ ला या नळ योजनेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी दोन सार्वजनिक विहिरीवरून उचल केलेले पाणी एका जलकुंभात साठविले जात होते. शिवाय याच पाण्याचा पुरवठा गावातील दिवसातून दोन वेळा केल्या जात होता. तब्बल ३५ वर्षानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यास जात असलेली अडचण पाहता नवीन नळयोजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून हिरवा झेंडी मिळाला. २०१६-१७ या वर्षात पावणे दोन कोटींची नळ योजना कार्यान्वित होवून नवसंजीवनी मिळाली. नव्याने पाईप लाईन, दोन नवीन जलकुंभ आणि एका विहिरीची यात भर पडली.
तसेच नळावर मिटर लाऊन २४ तास पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाली; पण जुनीच परिस्थिती कायम राहिली. पावणे दोन कोटी खुर्चनही घोरडवासियांना दिवसातून एकदाच पाणी देण्याचे धोरण कायम असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठवणूक कशी करावी हा प्रश्न भेडसावत आहे.
४० वर्षे जुन्या जलकुंभाचा आधार
सहा हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन नळयोजना कार्यान्वित झाली. यात दोन नव्याने जलकुंभ बांधण्यात आले. मात्र, नवीन नळयोजना मंजूर करताना ४० वर्ष जुन्या जलकुंभ जिर्ण झाल्याची बाब समोर करण्यात आली होती. जि.प. पाणी पुरवठा विभाग आजही जिर्ण जलकुंभातून पाणी पुरवठा करण्यास मंजूरी देत आहे. याचा अर्थ जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाला आराखडा तयार करताना तीन जलकुंभाची आखणी का केली नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
गावात २४ हातपंपासह पाणी पुरवठ्याच्या सात विहिरी
घोराडमध्ये २४ हातपंप, पाणी पुरवठा करू शकणाऱ्या ७ विहिरी आहेत. जवळपास ११५० नळ जोडणी आहे. या सर्व विहिरी नळ योजनेला जोडल्यास ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करणे सहज शक्यत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

Web Title: One time water is available for nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.