जो वाचतो, तोच वाचतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:05 PM2019-01-12T22:05:50+5:302019-01-12T22:06:19+5:30

जो वाचतो, तोच वाचतो. यामुळे माणूस संस्कारी होतो. कुठल्याही संकटांना लढा देण्यासाठी सक्षम होतो. असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.

The one who reads is worth it | जो वाचतो, तोच वाचतो

जो वाचतो, तोच वाचतो

Next
ठळक मुद्देअमृता फडणवीस : सायन्स किटचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : जो वाचतो, तोच वाचतो. यामुळे माणूस संस्कारी होतो. कुठल्याही संकटांना लढा देण्यासाठी सक्षम होतो. असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.
येथील जि.प. शाळेच्या शुक्रवारी सायंकाळी आयोजित सायन्स किटच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नागपूर विभागाच्या सचिव आयशा पठाण, जि.प. सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स. सभापती जयश्री खोडे, सरपंच रेखा शेंद्रे, जि.प. सदस्य विनोद लाखे, ए.के. सिंग, पारसमल पगारिया फाऊंडेशनचे शर्मा, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, अशोक कलोडे, संजय पाटील, तहसीलदार महेंद्र सोनोने, संजय वानखेडे, बन्सोड, तोडे, पुष्पा भगत, ग्रामविस्तार अधिकारी सुरेंद्र ढोक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना घडविण्याकरिता व त्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे. पालकांनी प्रयत्नरत रहावे, वाचनामुळे विद्यार्थ्यांना जीवनामध्ये मदत मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी धैर्याने विपरीत परिस्थितीचा सामना करावा. जो अडचणींवर मात करतो तोच खरे जीवन जगतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमादरम्यान तलाठी मंडळ कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी डब्ल्यूसीएलतर्फे १६ लाख ८५ हजारांचा धनोदश ग्रामपंचायत प्रशासनाला अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी काही ग्रामस्थांशी अमृता फडणवीस यांनी संवाद साधला. सदर कार्यक्रमाच्या सुरूवातीला येथील नवीन बसस्थानकाचे लोकार्पण अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ेकार्यक्रमाला केळझर येथील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: The one who reads is worth it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.