वर्धा जिल्ह्यात येणारा कांदा, बटाटा, लसूण आणि आले उतरणार गावाबाहेर; होणार निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:43 PM2020-04-30T12:43:37+5:302020-04-30T12:44:34+5:30

राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसूण आणल्या जातो. सदर जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे.

Onion, potato, garlic and ginger coming to Wardha district will be sterilized | वर्धा जिल्ह्यात येणारा कांदा, बटाटा, लसूण आणि आले उतरणार गावाबाहेर; होणार निर्जंतुकीकरण

वर्धा जिल्ह्यात येणारा कांदा, बटाटा, लसूण आणि आले उतरणार गावाबाहेर; होणार निर्जंतुकीकरण

Next
ठळक मुद्देशहराबाहेर ठरवले तीन अनलोडिंग पॉईंटजिल्हा प्रशासनासह कृउबाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसूण आणल्या जातो. सदर जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेली वाहने सॅनिटाईज करून त्यातील माल पूर्वी सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या मालवाहूत लादून त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना पुरवठा केल्या जाणार आहे. दत्तपूर टी-पॉईंटवरील अनलोडिंग पॉईंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते करण्यात आला.
वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तेथील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांला लागणारा आलू, कांदा, लसूण व अद्रक इतर जिल्ह्यातून येतो. या जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारे अनेकांच्या संपर्कात येताच त्यामुळे त्यांच्या माध्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून वर्धा शहराच्या दूर दत्तपूर शिवारात अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे. असेच अनलोडिंग पॉईंटट जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी तयार करण्यात आले असून दत्तपूर शिवारातील अनलोडिंग पॉईंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तहसीलदार प्रिती डुडुलकर, जिल्हा माकेर्टींग अधिकारी गौतम वालदे आदींची उपस्थिती होती. अनलोडिंग पॉईंटटवर पहिल्या दिवशी एकूण १३ मोठ्या मालवाहूतील आलू, कांदा, लसूण दक्षता घेत उतरविण्यात आला.

अशी राहते मागणी
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी २० टनाचे ७ ते १० ट्रक कांदा तसेच तितकाच आलू, तीन ट्रक लसून व दोन ट्रक अद्रकाची आवश्यकता असते. शिवाय तशी मागणी असते. ही जीवनावश्यक वस्तू इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येते. ती कोरोनामुक्त रहावी तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात कमीत कमी व्यक्ती यावे या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन दत्तपूर टी-पॉईंट भागातील एका हॉटेलच्या आवारात अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे.

चालक राहतो भ्रमणध्वनीवर संपर्कात
आलू, कांदा, लसून व अद्रक घेऊन वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या मालवाहूचा चालक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात भ्रमणध्वनीवर राहतो. तो मालवाहू घेऊन वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करणार त्यावेळी त्याला अनलोडिंग पॉईंटचे स्थळ सांगण्यात येते. त्याठिकाणी तो पोहोचल्यावर त्याचे वाहन सॅनिटाईज केले जाते. शिवाय त्या मालवाहूत असलेल्या व्यक्तींना वेगळे ठेवले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या वाहनात हा माल लादून वर्ध्याच्या व्यापाऱ्यांना वितरीत केला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी सांगितले.

कोरोना बाधित जिल्ह्यांमधून वर्धा जिल्ह्यात आलू, कांदे, लसूण आणि अद्रकाची आयात होत. परंतु, या जीवनावश्यक वस्तूंसोबत कोरोनाची एन्ट्री वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर जिल्ह्यात तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून सदर जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेले वाहन सॅनिटाईज केले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या वाहनात हा माल लादून तो व्यापाऱ्यांना दिला जातो. त्यांच्या माध्यमातून या मालाचा इतर व्यावसायिकांना पुरवठा होणार आहे. यामुळे जिल्हा कोरोनामुक्त रहाण्यासाठी फायदा होणार आहे. शिवाय आलू, कांदा, लसूण व अद्रकाची जिल्ह्यात टंचाई निर्माण होणार नाही.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.

Web Title: Onion, potato, garlic and ginger coming to Wardha district will be sterilized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.