६४,३९७ शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:30 PM2017-09-14T23:30:28+5:302017-09-14T23:30:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६४ हजार ३९७ शेतकºयांनी आपले सरकार सेवा, महाआॅनलाईन केंद्रात जात आॅनलाईन अर्ज भरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६४ हजार ३९७ शेतकºयांनी आपले सरकार सेवा, महाआॅनलाईन केंद्रात जात आॅनलाईन अर्ज भरले आहेत. जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ३६२ शेतकºयांचे आधार लिंक केले आहेत.
जिल्ह्यात ६७ हजार ९६५ शेतकरी अद्यापही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसात ६७ हजार ९६५ शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यात यश येईल अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू असतानाही लिंक फेलचा मोठा फटका त्यांना बसत आहे. कर्जमाफीकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. यात वर्धेत गुरुवारी जिल्ह्यातील आॅनलाईन केंद्रांवर चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले. वर्धेत शेतकºयांना होत असलेला त्रास करमी करण्याकरिता शासनाच्यावतीने घरपोच जात नोंदणी करण्याची सुविधा केली आहे.
शेतकरी गत तीन ते चार वर्षांपासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झाला होता. दोन्ही हंगामातील पीक हातातून गेल्याने यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकºयांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. आर्थिक संकटात तसेच दुष्काळस्थिती परिस्थितीमुळे कर्ज भरू न शकणाºया शेतकºयासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली.
३० जून २०१६ पर्यंत पीक कर्ज थकित असणाºया शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. यात २०१५-२०१६ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा ३१ जुलैपर्यंत परतफेड केलेल्या शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार पर्यंतची जी कमी असेल ती रक्कम शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यात सलग तीन वर्षे थकित असलेल्या कर्जाची रक्कम शासनाच्या अटीनुसार माफ करण्यात येणार आहे.
६७ हजार ९६५ शेतकरी कर्जमाफीच्या अर्जापासून दूरच
६७ हजार ९६५ शेतकरी कर्ज माफीसाठी अर्ज भरण्यात यश येईल अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १३ सप्टेंबर पर्यंत १ लाख ३२ हजार ३६२ शेतकºयांनी कर्ज माफीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. तर यातील ६४ हजार ३९७ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहे. तर १५ सप्टेंबर पर्यंत शेतकºयांनी अर्ज दाखल करावे यासाठी आपले सरकार सेवा केंद्र महाआॅनलाईन केंद्र व विविध केंद्रचालकांनी शेतकºयांना मदत करावी, असे संबंधित अधिकाºयांनी सूचना दिल्या आहे.
कर्जमाफीकरिता आधार कार्ड बंधनकारक
शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता आधारकार्ड असणे आवश्यक असल्याच्या बँकेच्या सूचना आहे. शेतकºयांनी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असले तरी आधारकार्डची छायांकित प्रत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत किंवा संबंधित तपासणीकडे शुक्रवारपर्यंत जमा करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ए.आर. कदम यांनी केले आहे.
जिल्हा बँकेकडून किंवा इतर राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकाकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी झाली असल्यास अशा शेतकरी सभासदांना शासनाकडून दीड लाखापर्यंत कर्ज माफी देण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांनी २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँककडून कर्ज घेवून नियमित परतफेड केलेली आहे. अशा शेतकºयांनाही २५ टक्के प्रोत्साहनपर सवलतीचा लाभ मिळणार आहे.
सर्व शेतकरी सभासदांनी आधारकार्डची छायांकित प्रत, बँकेच्या पासबुकाची फोटो असलेली छायांकित प्रत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शाखेत किंवा संबंधित तपासणीकाकडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्याकडे जमा करावी.
अर्ज भरताना अजूनही होते पैशाची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र महाआॅनलाईन केंद्र असे केंद्र शेतकºयांच्या हितासाठी देण्यात आले आहे. या आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना कुठलेही शुल्क नाही. त्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे. मात्र केंद्रचालक सर्रास १०० रूपये-१५० रूपये शेतकºयांकडून घेत आहेत. यांच्यावर अद्याप कुठलेही कार्यवाही करण्यात आली नाही. म्हणजे यात संबंधित अधिकाºयांचे पाठबळ असावे, अशी शंका नागरिकांमार्फत व्यक्त होत आहे.