आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 03:53 PM2017-08-27T15:53:37+5:302017-08-27T15:55:41+5:30

सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते.

The online loan-maker farmers are in the queue | आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

Next
ठळक मुद्देतांत्रिक अडचणींमुळे वेटींगच सुटीच्या कारणाने उडते तारांबळ संपूर्ण नोंदीबाबत संभ्रम

रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते. कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता शेतकºयांना वेटींगच करावे लागत आहे. त्यातच अंतिम तारीख जाहीर झाल्याने संपूर्ण नोंदीबाबत सध्या संभ्रमच निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना लागू झाली त्या काळापासून अंमलबजावणीकरिता अडचणीच आल्या आहेत. दरम्यान १५ सप्टेंबरपर्यंत सर्वच शेतकºयांच्या नोंदी झाल्या पाहिजे असे फर्मान मुख्यमंत्र्यांनी सोडले. दिलेल्या तारखेच्या आत आपली नोंद झाली पाहिजे असे शेतकºयांना वाटते. परिणामी शेतकºयांकडून ग्रामदूत केंद्रांवर एकच गर्दी होत आहे. एकाच वेळी सर्वत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सॉफ्टवेअर साथ देत नाही. वारंवार लिंक फेल होत आहे. शिवाय याकाळात बºयाच शासकीय सुट्ट्या आल्याने केंद्र बंद असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले आहे.
सरकसकट तर कधी नियमांच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा झाली. यानंतर कर्जमाफीच्या लाभाकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचा फतवा निघाला. आॅनलाईन नोंदीत प्रारंभीच्या दिवसांपासूनच लिंक फेलची तलवार शेतकºयांच्या मानगुटीवर पडली. यानंतर आधार लिंकच्या समस्याने डोके वर काढले. यावर मार्ग काढण्याकरिता मंत्रा नामक यंत्राची मागणी झाली. ते यंत्र आले असता काही दिवस सॉफ्टवेअरची समस्या आली. आता अंतिम तारीख आल्याने होणाºया गर्दीमुळे ही समस्या आणखीच जाणवत आहे.

वर्धेत ३८,७६७ शेतकºयांचीच नोंद
च्शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता महिन्याचा कालावधी होत आहे. यात वर्धेत आॅनलाईन आणि मंत्रा या यंत्राचा खोडा पडल्याने आॅफलाईनचा मार्ग काढण्यात आला. या आॅफलाईनच्या प्रकारामुळे शेतकºयांना आॅनलाईन होण्याकरिता ग्रामदूत केंद्रांवर चकरा मारव्या लागल्या. असे अतानाही वर्धा जिल्ह्यात केवळ ३८ हजार ७६७ शेतकºयांची आॅनलाईन नोंद झाली आहे. तर ३२ हजार ९८० शेतकºयांनी अर्ज भरले असून त्यांची नोंद होणे बाकी आहे. वर्धेत एकूण ९८ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे दिलेल्या तारखेच्या आत सर्व शेतकºयांची नोंद होईल अथवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: The online loan-maker farmers are in the queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.