दोन वर्षांत गांजाचे केवळ २६ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:38 AM2017-12-24T00:38:50+5:302017-12-24T00:39:01+5:30

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत.

Only 26 cases of Ganja in two years | दोन वर्षांत गांजाचे केवळ २६ गुन्हे

दोन वर्षांत गांजाचे केवळ २६ गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्देतस्करीकडे दुर्लक्ष : पोलिसांकडून कारवाईच्या नावावर देखावाच

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना जिल्ह्यात दाखल गुन्ह्याची माहिती घेतली असता ती सर्वांना अवाक् करणारीच आहे. वर्धा जिल्ह्यात दोन वर्षांत केवळ २६ गुन्हे दाखल असून आरोपींच्या नावावर ४२ जणांनाच अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पोलिसांकडून झालेली कारवाई नाममात्रच असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक, जिल्ह्यातील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत गांजाचा भर दिवसा धूर निघतो, तर शहरातील काही मोठ्या मैदानावर गांजा ओढणाºयाची टोळकी बसून राहत असल्याचे दिसून आले आहे. याची माहिती शहरातील पोलिसांना नाही, असे नाही; पण दारूच्या व्यवसायत मिळत असलेल्या आर्थिक लाभाची चटक असल्याने यातही मिळकतीची अपेक्षा ठेवून गांजा विके्रत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शहरात गांजा विक्रीचे अनेक ‘अड्डे’ निर्माण झाले आहेत.
रेल्वेच्या जाळ्यात वर्धा मध्यभागी येत असल्याने वर्धेतील अनेक अवैध व्यवसायाला याचा लाभ मिळत आहे. वर्धेत आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन वर्षांत १२ गुन्हे दाखल करून २७ आरोपींना अटक केली आहे. यात काही आरोपी वर्धेत उतरून अमरावती येथे गांजा नेणारे असल्याचे समोर आले आहे.
रेल्वेतून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना नाही, असे नाही; पण त्यांच्याकडून कारवाईच्या नावावर केवळ चिल्लर विक्रेत्यांवरच कारवाई होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळेच वर्धेत गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांत राडा होऊन एकाचा जीव गेला. या प्रकरणातील आरोपी आणि मृतक गांजाच्या आहारी गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र त्यांच्यापर्यंत गांजा पोहोचला कसा, याचा शोध घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
काही पोलीसही गांजाच्या आहारी
वर्धेत दारूबंदी असताना अनेक पोलीस दारूच्या आहारी गेल्याचे समोर आले आहेत. मद्यपान करून कर्तव्यावर असलेल्या अनेक पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली. याप्रमाणेच अनेक पोलीस गांजाच्या आहारी गेल्याचेही दिसून येते. वर्धा शहरातील मध्यभागी असलेल्या पालिकेच्या अर्धवट बांधकामाचा लाभ उचलत मोठ्या प्रमाणात गांजाचा धूर निघत असतो. येथे काही पोलिसांकडूनही चिलम ओढण्याचा प्रकार घडल्याचे अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणाºया कर्मचाºयांवर कारवाई करीत फोफावत असलेल्या गांजाच्या व्यवसायावर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

Web Title: Only 26 cases of Ganja in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.