जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:44 PM2018-08-17T23:44:31+5:302018-08-17T23:45:15+5:30

अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

Only 45 percent rain in the district | जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

Next
ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : जलाशयेही रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ९२०.७१ च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. यंदा १६ आॅगस्टपर्यंत केवळ ४५.२५ टक्केच पाऊस झालेला आहे. आणखी दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला असून या कालावधीत पर्जन्यमान व्यवस्थित न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाची शक्यता आहे.
वर्धा तालुक्यात सरासरी ८८९.४० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंत केवळ २४२.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावीत वर्धा तालुक्यात ४७५.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सेलू तालुक्यात जून ते सप्टेंबर या काळात ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट पर्यंत तालुक्यात २३८.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १६ आॅगस्ट पर्यंत तालुक्यात ५७९.४७ मि.मी. पाऊस झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. देवळी तालुक्यात सरासरी ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. येथेही आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९३.२४ पाऊस झाला आहे. सेलू व देवळी तालुक्यात सरासरी ३९.६१ व ४८.६० टक्केच पाऊस पडला आहे. हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. १६ आॅगस्टपर्यंत हिंगणघाट तालुक्यात ६१४.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात ३६.९८ टक्के पाऊस झाला आहे. समुद्रपूर तालुक्यात चार महिन्यात १००१.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट महिन्याच्या मध्यार्धापर्यंत ५०८.९७ पावसाची नोंद झाली. या तालुक्यात ४९.१९ टक्के पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यात ८५०.३० मि.मी. पडतो. आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९१.५३ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात केवळ ४२.१९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. आष्टी तालुक्यात चार महिन्यात ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ४२०.९९ मि.मी. पाऊस झाला. येथे ५१.३२ टक्के पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यात चार महिन्या ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्टपर्यंत ४४८.५४ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. येथे ४८.१३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ९२०.७१ मि.मी.च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ५०४.०८ च्या सरासरीने ४०३२. ६७ मि.मी. झाला. जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Only 45 percent rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.