जीर्ण इमारतीत चालतो अलाहाबाद बँकेचा कारभार

By admin | Published: July 8, 2015 02:13 AM2015-07-08T02:13:22+5:302015-07-08T02:13:22+5:30

स्थानिक अलाहाबाद बँकेचा कारभार गत कित्येक वर्षांपासून जीर्ण इमारतीतून सुरू आहे. ही इमारत कधीही ढासळून अपघात होण्याची शक्यता आहे.

Operating in a dilapidated building, Allahabad Bank is in charge | जीर्ण इमारतीत चालतो अलाहाबाद बँकेचा कारभार

जीर्ण इमारतीत चालतो अलाहाबाद बँकेचा कारभार

Next

अपघाताची शक्यता : लिंक फेलमुळे अधिकाऱ्यांसह ग्राहक त्रस्त
विजयगोपाल : स्थानिक अलाहाबाद बँकेचा कारभार गत कित्येक वर्षांपासून जीर्ण इमारतीतून सुरू आहे. ही इमारत कधीही ढासळून अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देत बँकेला स्वतंत्र इमारत देणे गरजेचे झाले आहे.
अलाहाबाद बँक ४० वर्षांपासून जीर्ण इमारतीत सुरू आहे. ही इमारत कोसळून अपघाताची शक्यता आहे. ग्रामस्थांनी तोंडी व लेखी तक्रारी केल्या; पण वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. सदर बँक दुसऱ्या ठिकाणी हलविण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. बँक नियमानुसार जागा नसताना त्याच ठिकाणी ती सुरू आहे. गावात दुसरीकडे जागा असून नवीन इमारत तयार आहे; पण त्या इमारतीत नियमानुसार जागा नसल्याची बाब पूढे करून ती जागा ना-पसंत केली जात आहे. ही बँक अन्यत्र हलविण्यासाठी अपघाताची तर प्रतीक्षा केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बँकेत २० गावांतील शेतकरी, नागरिकांची खाती आहे. खातेदार संख्येनुसार बँकेत कर्मचारी संख्याही अत्यल्प आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकऱ्यांची बँकेत ताटकळ होते. यामुळे कर्मचारी नियुक्त करावे आणि बँक नवीन इमारतीत हलवावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
एटीएम मशीनच नाही
या बँकेने सर्व ग्राहकांना एटीएम कार्ड दिले; पण एटीएम मशीन नसल्याने कार्ड शोभेचे ठरत आहे. त्या कार्डचा कोणताही उपयोग होत नाही. बाहेरगावी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीनमध्ये हे कार्ड वापरल्यास २० ते २५ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अकारण २० ते २५ रुपयांचे नुकसान होत असल्याने गावातच अलाहाबाद बँकेने एटीएम सुरू करण्याची मागणीही जोर धरत आहे.
नेहमीच लिंक फेल राहत असून याबाबत झोनल मॅनेजर नागपूर यांना तक्रार दिली आहे. शिवाय जीर्ण इमारतीत बँकेचे कामकाज चालत असून कमी जागेत काम करावे लागत आहे. लिंक फेल राहत असल्याने कर्मचाऱ्यांना वर्धा येथे जाऊन शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाची कामे करावी लागत आहेत.
- अभिजीत वानखडे, शाखा व्यवस्थापक, अलाहाबाद बँक, विजयगोपाल.
लिंक फेलमुळे व्यवहार ठप्प
लिंक फेल होणे ही बाब नित्याची झाली आहे. बँक आॅनलाईन असून या बँकेची लिंक दररोज दोन ते तीन तास गायब होत असल्याने शेतकऱ्यांना बँकेत ताटकळावे लागत आहे. लिंक फे होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कामात व्यत्यय येत असून व्यवहार ठप्प होत आहेत.

Web Title: Operating in a dilapidated building, Allahabad Bank is in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.