स्पर्धा परीक्षांतून होतात रोजगाराच्या वाटा मोकळ्या
By admin | Published: March 1, 2015 01:30 AM2015-03-01T01:30:05+5:302015-03-01T01:30:05+5:30
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे़ यामुळे स्पर्धा परीक्षांना महत्त्व आले असून या परीक्षांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या वाटा मोकळ्या होतात, असे मत उमेश महल्ले यांनी व्यक्त केले़
वर्धा : सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे़ यामुळे स्पर्धा परीक्षांना महत्त्व आले असून या परीक्षांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या वाटा मोकळ्या होतात, असे मत उमेश महल्ले यांनी व्यक्त केले़
कामगार कल्याण केंद्राच्यावतीने २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले़ शीतल मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात ते बोलत होते़ उद्घाटन अ़भा़ ग्राहक कल्याण परिषदेच्या अध्यक्ष उषा फाले यांच्या हस्ते सहायक कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, सहा़ लेखाधिकारी अरुणा कडू, प्रा. उमेश महल्ले, कामगार कल्याण अधिकारी सत्यजीत चौधरी, प्रा. राजकुमार शिंगाडे यांच्या आतिथ्यात पार पडले़ सतीश दाभाडे यांनी मंडळाच्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. प्रशिक्षणात ४० कामगार व कामगार कुटुंबियांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ प्रशिक्षक उमेश महल्ले, सावंत जाधव, राजकुमार शिंगाडे, मदनसिंग पडवाल व निशा गाडेकर यांनी एमपीएससी, रेल्वे, एससीसी, पोलीस भरती, जिल्हा निवड समिती, ग्रामसेवक, तलाठी, नेट-सेट आणि अन्य स्पर्धात्मक परीक्षा आदी परीक्षांच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे संचालन केंद्र संचालक पांडुरंग बावणे यांनी केले तर आभार सुषमा बाराहाते यांनी मानले़
प्रशिक्षणानंतर शेवटच्या सत्रात समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उमेश महल्ले तर अतिथी म्हणून मदनसिंग पडवाल, डॉ. देशपांडे, निशा मोहिते उपस्थित होते. मंडळाच्या कर्मचारी बेबी चाकुंदे, निलेश महल्ले यांच्यासह विद्यार्थिनी व सभासदांनी सहकार्य केले़