वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:07+5:30

वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला.

Opportunities for 'two' in Wardha and three times in Arvi | वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

Next
ठळक मुद्देमागोवा विधानसभेचा : काँग्रेसचाच राहिला वरचष्मा, यंदाही अपक्ष बाशिंग बांधूनच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला; पण जसजशी प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर सध्या वर्धा जिल्ह्यात पार पडणाऱ्या वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चार विधानसभेच्या जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी कामालाही लागले आहे. अनेक अपक्ष उमेदवार आमदारपदासाठी सध्या बाशिंग बांधून असून वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी दोनदा तर आर्वी मतदार संघातील मतदारांनी तीनवेळा अपक्ष उमेदवारांना बहुमताचा कौल दिल्याचे गत ५२ वर्षांचा इतिहास सांगतो.
वर्धा आणि आर्वी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. मागील ५२ वर्षांत वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा उमेदवार आठ वेळा, तर आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार सात वेळा विजयी झाले. सध्या आर्वी काँग्रेसच्या तर वर्धा विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असले तरी या निवडणुकीत मतदार कुणाला पसंती देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला. त्यावेळी वर्ध्याचे आमदार म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राकाँत प्रवेश केलेल्या याच उमेदवाराने घड्याळ या चिन्हावर पुन्हा एकदा आपले राजकीय भविष्य अजमावले. परंतु, मतदारांनी मोदी लाटेवर स्वार होत भाजपच्या उमेदवाराला पसंती दिली. तर आर्वी विधानसभा मतदार संघात काँग्रेसला सातवेळा, आयसीएस व भाजपला एक वेळा आणि अपक्ष उमेदवारांना तीनवेळा मतदारांनी बहुमताचा कौल दिला आहे. सध्या येथे काँगे्रसचा आमदार असून २००९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवाराने धोबीपछाड दिली होती. त्यानंतर आता २०१९ ची ही सार्वत्रिक निवडणूक होत असून त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वर्ध्यात विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्याला दिला अपक्षाने धोबीपछाड
वर्धा विधानसभा क्षेत्रात १९७८, १९८० व १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग विजय मिळविणाऱ्यां काँग्रेसच्या उमेदवाराला १९९० मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने धोबीपछाडच दिली. परंतु, त्यानंतर याच काँग्रेसच्या उमेदवाराने पुन्हा १९९५, १९९९ व २००४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली.

आमदारांना मिळतो प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधी
राज्य सरकारकडून प्रत्येक आमदाराला प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधी दिला जातो. हा निधी त्यांनी गरजेनुसार रस्ते, गटार, पूर संरक्षण भिंत, स्मशानभूमी विकास आदी विकासकामांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त आहे.

Web Title: Opportunities for 'two' in Wardha and three times in Arvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.