मेकॅनिकल शाखेत उज्ज्वल भविष्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:04 AM2018-07-11T00:04:54+5:302018-07-11T00:05:27+5:30
अभियांत्रिकीच्या सर्व शाखामध्ये उत्तम भविष्य घडविता येते. कुठलेही शाखा कमी दर्जाची नाही. मात्र केवळ अभियंत्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवू नका. आपले शिक्षण सार्थकी झाले पाहिजे, असे उज्ज्वल भविष्य घडवा, असे प्रतिपादन केनिया येथे कार्यरत ग्रीनस्पॅन अग्रीटेक प्रा.लि.चे गोपाल शिंदे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अभियांत्रिकीच्या सर्व शाखामध्ये उत्तम भविष्य घडविता येते. कुठलेही शाखा कमी दर्जाची नाही. मात्र केवळ अभियंत्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवू नका. आपले शिक्षण सार्थकी झाले पाहिजे, असे उज्ज्वल भविष्य घडवा, असे प्रतिपादन केनिया येथे कार्यरत ग्रीनस्पॅन अग्रीटेक प्रा.लि.चे गोपाल शिंदे यांनी केले.
सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. योगेश महंतारे, प्रा. जी.पी. ढलवार उपस्थित होते. मेकॅनिकल इंजिनिअरींग क्षेत्र व्यापक असून भविष्य घडविता येईल, अशा खूप संधी आहेत. केनिया येथील कंपनीची कार्यप्रणाली कशा पद्धतीने चालते. कशाप्रकारे तांत्रिक मनुष्यबळ हवे असते, असे विविध अनुभव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कुशल अभियंता होण्याचे ध्येय समोर ठेवून त्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असणे गरजेचे असते. तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलते आहे हा बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानात होत असलेले बदल अभ्यासून ज्ञान अद्यावत ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. महंतारे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील अद्यावत टेक्नॉलॉजीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ढलवार यांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.