पशुसंवर्धन सहायक आयुक्ताच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:04 PM2018-09-24T23:04:31+5:302018-09-24T23:04:50+5:30
हिंगणघाटच्या लघू पशु सर्व चिकित्सालयात सुविधा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जनावरांवर योग्य उपचार होत नाही. अधिकाºयांची मुख्यालयाला दांडी राहत असल्याने जनावरांना शस्त्रक्रिया केली जात नाही, अशा तक्रारीचा गोपालकांनी पाढा वाचल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक बोलावून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाटच्या लघू पशु सर्व चिकित्सालयात सुविधा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जनावरांवर योग्य उपचार होत नाही. अधिकाºयांची मुख्यालयाला दांडी राहत असल्याने जनावरांना शस्त्रक्रिया केली जात नाही, अशा तक्रारीचा गोपालकांनी पाढा वाचल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक बोलावून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते. यासंदर्भात लोकमतनेही वृत्त प्रकाशित करताच पशुसंवर्धन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे हिंगणघाटच्या पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
हिंगणघाट परिसराचा आवाका लक्षात घेता परिसरातील गोपालकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुविधायुक्त असे तालुका लघू पशु सर्व चिकित्सालय स्थापन करण्यात आले. या चिकित्सालयासोबत आठ गावे जोडलेली आहेत.या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, एक लिपीक व एक परिचर असे पदे मंजूर आहेत. त्यापैकी लिपीक व पशुधन पर्यवेक्षक यांची पदे रिक्त आहेत. या ठिकाणी सुविधा असतानाही अधिकारीच मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने जनावरांवर योग्य उपचार होत नाही, अशी ओरड गोपालकांकडून करण्यात आली. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण झाल्याने याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे गोपालकांडून सांगण्यात आले. त्यामुळे आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक बोलावून चांगलेच धारेवर धरत जनावरांवर योग्य उपचार करा, शस्त्रक्रिया अशाही सूचना दिल्या होत्या. याचीच दखल घेत पशुसंवर्धन आयुक्तांनी चौकशी लावली आहे.
पशुसंवर्धन आयुक्तांनी मागितला खुलासा
तालुक्यात तोंड खुरी व पायखुरीची लागण झाली असतानाही जनावरांना योग्य उपचार होत नाही, असा आरोप पशुपालकांकडून करण्यात आला होता.यासदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी हिंगणघाटच्या सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, पशुधन विकास अधिकारी हिंगणघाट व पशुधन विकास अधिकारी समुद्रपूर यांना पत्र देऊन खुलासा मागितल्याचीही माहिती आहे.
पशुसंवर्धन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांच्या आदेशानुसा मंगळवारी हिंगणघाटला जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर करावयाचा आहे.
- डॉ.राजीव भोजणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा.