Corona Virus in Wardha; सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या भाजीबाजाराची जागा बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 01:14 PM2020-03-28T13:14:02+5:302020-03-28T13:14:43+5:30

भाजीपाला खरेदी करताना नागरिकांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क व्हावा याउद्देशाने हिंगणघाटच्या नगर पालिका प्रशासनाने येथील भाजीबाजाराची जागा बदलून टाकली आहे.

In order to maintain a safe distance, the vegetable market of Hinganghat in Wardha district was changed | Corona Virus in Wardha; सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या भाजीबाजाराची जागा बदलली

Corona Virus in Wardha; सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या भाजीबाजाराची जागा बदलली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: भाजीपाला खरेदी करताना नागरिकांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क व्हावा याउद्देशाने हिंगणघाटच्या नगर पालिका प्रशासनाने येथील भाजीबाजाराची जागा बदलून टाकली आहे. येथे भरणाऱ्या आठवडी बाजाराला अधिक व्यवस्थित करून तसेच तेथे चुन्याने रेखांकन करून ओटे तयार करण्यात आले आहेत.
या ठिकाणी आठवडी बाजार भरत असतो. मात्र तो एकत्र न ठेवता आता आंबेडकर चौक, दत्त मंदिर, कारंजा चौक अशा विविध ठिकाणी विभाजित करण्यात आला आहे. गर्दी टाळण्याचा या मागचा उद्देश आहे.
मुख्य भाजीबाजाराला शहरात आठ ठिकाणी विभाजित केल्याने नागरिकांची भाजीसाठी उडणारी झुंबडही कमी झाली आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखले जावे यासाठी तेथे रेखांकनही करण्यात आले आहे. येथील एसडीओ यांच्या मार्गदशर््ानाखाली नगरपालिका मुख्याधिकारी अनिल जगताप व्यवस्था पाहत आहेत.
 

 

 

Web Title: In order to maintain a safe distance, the vegetable market of Hinganghat in Wardha district was changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.