आमच्या स्वप्नांना मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:13 AM2017-08-28T00:13:50+5:302017-08-28T00:14:09+5:30

आॅनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींमुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या शहरातील दोन अत्यंत गरजू हिरकणींना सुधीर दिवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत ....

Our dreams got strength | आमच्या स्वप्नांना मिळाले बळ

आमच्या स्वप्नांना मिळाले बळ

Next
ठळक मुद्देपत्रकार परिषद : अभियांत्रिकीसाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : आॅनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींमुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या शहरातील दोन अत्यंत गरजू हिरकणींना सुधीर दिवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करून मदत केली. ही मदत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. लोचन चोपडे व वैष्णवी घोटकर या उत्तम गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थिनींवर आॅनलाईन प्रवेश गोंधळाने संकट आले होते. याबाबतचा अनुभव त्यांनी पत्रपरिषदेत सांगितला.
वैष्णवी व लोचन म्हणाल्या की, जुलैमध्ये पॉलिटेक्निकचा निकाल लागला. दोघींनाही ८८ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्याने शासकीय महा. मध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळणे शक्य होते. त्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. काही दिवसांतच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथून प्रवेश निश्चित झाल्याचा संदेश मोबाईलवर आला. लगेच ५ हजार रुपये भरून जागा निश्चित करून घेण्याचे सांगितले होते. यामुळे त्यांनी पैसे भरून प्रवेश निश्चित केला. कागदपत्र तपासणी शासकीय तंत्र निकेतनमध्ये होती. ती प्रक्रियाही पूर्ण केली. १६ ते १९ आॅगस्ट दरम्यान उर्वरित शुल्क भरून शासकीय अभियांत्रिकी महा. नागपूर येथे प्रवेश घेण्यास सांगितले. यामुळे प्रवेश निश्चित झाल्याच्या आनंदात त्या कामाला लागल्या; पण १३ आॅगस्ट रोजी मोबाईलवर संदेश आला. यात एकीला गजानन महाराज महा. शेगाव तर दुसरीला प्रियदर्शिनी महा. नागपूर या खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची सूचना होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पॉलिटेक्निकपर्यंत शिक्षण घेतले. दोघींनीही कारण शोधण्याचा प्रयत्न केला; पण कुणी सांगत नव्हते. अखेर तिसºया राऊंडमध्ये महाविद्यालय बदलण्याचे आॅप्शन भरल्यानंतर पासवर्ड हॅक करून कुणीतरी हे कृत्य केल्याचे लक्षात आले. याबाबत पोलिसात तक्रार दिली असून तपास सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे विषेश कार्य अधिकारी सूमित वानखडे यांनीही सहकार्य करीत दोघींनाही शासकीय अभियांत्रिकी महा. नागपूर येथे प्रवेशास मदत केली. पत्रपरिषदेला सुधीर दिवे, अनिल जोशी, भाजयुमो प्रदेश सचिव प्रिया शिंदे व अन्य उपस्थित होते.

Web Title: Our dreams got strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.