चितळासह बछड्यास काढले सुखरूप विहिरीबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:15 PM2019-05-25T22:15:22+5:302019-05-25T22:16:11+5:30
तळेगाव वनपरिक्षेत्रातील सिडेट कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या एका शेतातील निर्माणाधीन विहिरीत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत असलेले चितळ व तिचा बछडा पडला. या दोघांची विहिरीत मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वनपरिक्षेत्रातील सिडेट कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या एका शेतातील निर्माणाधीन विहिरीत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत असलेले चितळ व तिचा बछडा पडला. या दोघांची विहिरीत मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून त्या दोघांनाही सुखरूप विहिरीबाहेर काढून जीवदान दिले.
सध्या तळेगाव वनपरिक्षेत्रातील अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. अशातच पाण्याच्या शोधात असलेले चितळ व बछडा निर्माणाधीन विहिरीत पडले. विहिरीत वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास येताच तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकाºयांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या चमुसह घटना स्थळ गाठले. शिवाय पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या मयुर वानखेडे यांनीही आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी तसेच वन्यप्राणी मित्रांनी शर्तीचे प्रयत्न करून विहिरीत पडलेल्या या वन्यप्राण्यांना सुखरूप विहिरीबाहेर काढले. या कार्यात फय्याज अली, पप्पु भुयार यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. या दोन्ही वन्यप्राण्यांची सुरूवातीला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.