वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 03:40 PM2022-06-03T15:40:25+5:302022-06-03T16:27:24+5:30

तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

over fifteen hundred hens died in Wardha due to heatstroke in wardha poultry farm | वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

googlenewsNext
ठळक मुद्देदेवळी तालुक्यातील मलातपूर येथील घटना

वर्धा : तब्बल पाच तास विद्युत पुरवठा बंद राहिल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. अशातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना देवळी तालुक्यातील मलातपूर येथे घडली असून, यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी सागर पजगाडे यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. त्यांनी मलातपूर येथे आठ हजार पक्ष्यांची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र उभारले आहे. त्यासाठी त्यांनी बँकचे १५ लाखांचे कर्जही घेतले आहे. कुक्कुटपालनाचा व्यवसाय जोमात येत नाहीच तो महावितरणकडून परिसरातील विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित केला. तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे सागर पजगाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.

असे ठेवले जायचे तापमानावर नियंत्रण

पोल्ट्री फार्मचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एक्सझॉस्ट फॅन आणि दोन मोठे कूलर लावले आहेत. सोबतच आवश्यक ठिकाणी वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवले जायचे; परंतु महावितरणकडून खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा तब्बल पाच तास सुरळीत न करण्यात आल्याने हे सर्व बंद होते. अशातच पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मरण पावल्या.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्राथमिकदृष्ट्या उष्माघातने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने देवळी पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: over fifteen hundred hens died in Wardha due to heatstroke in wardha poultry farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.