मालक आपण लई कष्ट करू पण....

By admin | Published: September 14, 2015 02:09 AM2015-09-14T02:09:43+5:302015-09-14T02:09:43+5:30

राज्यासह जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पोळ्याच्याच पर्वावर वडनेर येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

The owner will work hard for you but .... | मालक आपण लई कष्ट करू पण....

मालक आपण लई कष्ट करू पण....

Next

पराग मगर वर्धा
राज्यासह जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पोळ्याच्याच पर्वावर वडनेर येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. पोळ्याच्या चंगळवादी उत्साहात याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष झाले असले तरी ‘मालक आपण लई कष्ट करू, पण तुम्ही आत्महत्या करायची न्हाय’ या सोशल मीडियावरील चित्रमय संदेशाने अनेकजण गहिवरले.
पोळ्याच्या पूर्वसंध्येलाही अवघ्या राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच होते. जिल्ह्यात वडनेर येथील विठोबा वावधने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. एकीकडे मोठमोठ्या मंडळांद्वारे बैलपोळा तसेच तान्हापोळा उत्साहात साजरा झाला. बक्षीसांची लयलूट झाली. बैलांच्या उपकारातून उतराई होण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी उसनवारी घेत पोळा साजरा केला. बैलांना सजविले. हा दिवस त्याच्याकरिता महत्त्वाचा; पण पावसाच्या दडीने सोयाबीनवर आलेला रोग व पावसाच्या प्रतीक्षेतील कपाशी उत्पन्न देईल अथवा नाही हा विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत आहे. यामुळे अनेकांच्या मनात आजही जीवनयात्रा संपविण्याचे विचार डोकावत असतीलही.
सतत चर्चेत राहत असलेल्या ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयाला सोशल मीडियावर नवीन धुमारे फुटत आहेत. माणसांना पोळ्याच्या शुभेच्छा देत आपणही बैल असल्याचे भासवत हास्यविनोदही निर्माण केले जात आहे. परंतु अशातच पाठमोऱ्या एका शेतकऱ्याच्या दोन्ही खांद्यावर मान ठेवून ‘मालक आपण लई कष्ट करू, पण तुम्ही आत्महत्या करायची न्हाय’ या संदेशाचे व्हायरल झालेले चित्र अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहे. या चित्रातही शेतकरी हतबल दिसतो. त्यामुळे तो आजच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्वच करीत आहे. शासनानेही या चित्राकडे बघावे आणि शेतकरीच नाही तर त्या बैलांचीही मनोव्यथा समजून घावी, अशी आशा व्यक्त होत आहे.
उत्सव नेमका कुणासाठी?
शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र बैलपोळा जल्लोषात साजरा झाला. वर्षभर मानेवर जू शिवाय काहीही नसलेल्या बैलांना सजविण्यात आले होते. शेतात शांतपणे आपले काम करीत असलेल्या बैलांच्या कानापाशी मोठमोठ्याने ढोल वाजविले जात होते. कुणी कुणी तर फटाकेही फोडत होते. यामुळे घाबरलेले बैल सैरावैरा पळत होते, बिथरत होते. शेतकऱ्यांना त्यांना आवरणे कठीण झाले होते. त्यामुळे पोळ्याच्या दिवशीही अनेक बैलांना दोराचे फटके खावे लागले. या प्रकारामुळे हा सण नेमका कुणासाठी हा प्रश्न उपस्थित होत होता.

Web Title: The owner will work hard for you but ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.