जमिनीच्या पट्ट्यांचा मालकी हक्क द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:35 PM2018-10-11T22:35:09+5:302018-10-11T22:35:27+5:30
शहरानजिकच्या म्हसाळा येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जमीनीच्या पट्ट्याचा मालकी हक्क देण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरानजिकच्या म्हसाळा येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जमीनीच्या पट्ट्याचा मालकी हक्क देण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
म्हसाळा येथील वस्तीत मागील अनेक वर्षांपासून नागरीक राहत आहे. ते ज्या जागेवर राहतात त्या जागेचा कर, पाणी कर आणि वीज देयकही अदा करीत आहे. पण, शासनाने अजूनही त्यांना त्या जागेचा मालकी हक्क दिला नाही. नागपूर शहरात राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना जमिनीचे पट्टे दिले. त्याच कायद्यानुसार म्हसाळ्यातील नागरिकांनाही जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. पंधरा दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.निवेदन देताना जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.