वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

By admin | Published: April 2, 2015 02:01 AM2015-04-02T02:01:08+5:302015-04-02T02:05:49+5:30

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती घडवून आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिलेल्या निर्देशानुसार वायगाव (नि.) चौरस्ता

Panfalla movement for a different Vidharbha | वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

Next

वर्धा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती घडवून आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिलेल्या निर्देशानुसार वायगाव (नि.) चौरस्ता व जाम येथे प्रतिकात्मक पानफुल आंदोलन केले़ दुपारी १२ ते ४ पर्यंत चाललेल्या या आंदोलनात बसेससह सर्व वाहने थांबवून प्रवाशांना फूल व माहितीपत्रक देऊन वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची गरज समजाऊन सांगण्यात आली. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन तीव्र करण्यासाठी जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही प्रवाशांना करण्यात आले.
५४ वर्षे महाराष्ट्रात राहून आणि २० वर्षांपूर्वी वैधानिक विकास मंडळाची स्थापना होऊनही विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भ निर्मितीच्या वेळी करण्यात आलेला नागपूर करार पाळण्यात आला नाही. लोकसंख्येच्या तुलनेने विदर्भासाठी आर्थिक तरतूद करण्याचे वचन सत्ताधाऱ्यांनी कधीच पाळले नाही. यामुळे विदर्भप्रदेश ओसाड झाला. अनुशेष (बॅकलॉग) ७५ हजार कोटींनी वाढला. शेतीमालास रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. औद्योगिक विकास न झाल्याने बेरोजगारी वाढली. सिंचनाची सोय न झाल्याने शेतीतील गरिबी वाढली. आदिवासीबहूल क्षेत्रातील कूपोषण वाढले. गरजेपेक्षा दुप्पट वीज निर्मिती विदर्भात होऊनही भारनियमन वाढले. नक्षलवाद वाढला़ विदर्भात वायूप्रदूषण वाढले. यामुळे श्वसनरोगाचे गंभीर आजार वाढले. रोजगारीच्या शोधात वैदर्भीय जनता स्थलांतर करीत असल्याने राज्याची लोकसंख्या वाढत असूनही विदर्भाची लोकसंख्या घली़ यासह अन्य बाबींची प्रवाशांना जाणीव करून देण्यात आली.
आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सरोज काशीकर, महासचिव गंगाधर मुटे, दत्ता राऊत, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शेख बाबा, संध्या राऊत, डॉ. सुधाकर महाकाळकर, डॉ. पोकळे, अरविंद राऊत, गणेश मुटे, नारायण होले, शांताराम भालेराव, संतोष लाखे, निलेश फुलकर, भारत लाखे, रवींद्र दांडेकर, प्रवीण पोहाणे, विनोद काळे, अजय फुलझेले, खुशाल हिवरकर यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Panfalla movement for a different Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.