आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:06 PM2019-05-21T22:06:32+5:302019-05-21T22:07:25+5:30

पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

Panic of leopard in Ashti taluka | आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत

आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत

Next
ठळक मुद्दे१५ दिवसांत १२ जनावरे ठार : वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
पाण्याच्या शोधार्थ सध्या अनेक वन्यप्राणी गाव आणि शेतशिवारांकडे आपला मोर्चा वळवित आहेत. अशातच गोठ्यातील आणि शेतात बांधून असलेल्या जनावरांना गतप्राण करण्याचा सपाटा बिबट्याने लावल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे. असे असले तरी बिबट्याही विविध गावांच्या परिसरात प्रवेश करून आपली दहशत कायम ठेवत आहे. सोमवार २० मे रोजी रात्री बेलोरा (बु.) येथील शेतकरी रवींद्र जाणे यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने ठार केले. हे वासरू गोठ्यात बांधून होते. सकाळी ही घटना लक्षात आली. माहिती मिळताच सरपंच मिलिंद जाणे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक रसिका अवथळे यांना माहिती दिली.
वाघाने पाडला बकरीचा फडशा
बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पा जवळील बोरी गावातील एका शेळीपालकाच्या मालकीच्या बकरीवर पट्टदार वाघाने हल्ला करून तिला गतप्राण केले. या घटनेमुळे शेळीपालक नरेश किरडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरात पट्टेदार वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
बोरी येथील नरेश किरडे हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात गावातील बकºया चारण्यासाठी गेले होते. दरम्यान झुडूपात दबा धरून बसून असलेल्या पट्टेदार वाघाने बकºयांच्या कळपावर हल्ला केला. शिवाय एका बकरीला गतप्राण केले. आरडा-ओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. त्यानंतर इतर बकºयांना एकत्र करीत त्यांना गावाच्या दिशेने हाकलण्यात आल्याने इतर बकºयांचे प्राण बचावले. वाघाने बकरी गतप्राण केल्याने शेळीपालकाचे ९ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी घेतली आहे. नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
वनविभागही हतबल
या परिसरात वनविभागाच्यावतीने गस्त घातली जात आहे. मात्र, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर, पिलपूर, येनाडा, लहान आर्वी, जैतापूर या गावाच्या हद्दीत बिबट्या काळोखाचा फायदा घेत प्रवेश करून पाळीव जनावरांना ठार करीत असल्याने पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या परिसरात सध्या दोन बिबट्यांचा मुक्तसंचार होत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

वन्यप्राणी गावाकडे फिरकतात यासाठी गस्त लावली आहे. मात्र, रात्रीला बिबट पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गस्तही वाढविण्यात आली आहे.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).

Web Title: Panic of leopard in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.