पारधी आवास योजनेत वर्धा जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:20 AM2018-03-22T00:20:33+5:302018-03-22T00:20:33+5:30

मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षी भाजपाची सत्ता येऊन २१ मार्च रोजी अध्यक्षाची निवड झाली. आज भाजप सत्तेची वर्षपूर्ती झाली.

Pardhi Awas Yojana is first in Wardha district | पारधी आवास योजनेत वर्धा जिल्हा राज्यात प्रथम

पारधी आवास योजनेत वर्धा जिल्हा राज्यात प्रथम

Next
ठळक मुद्देमिनी मंत्रालयातील सत्तेची वर्षपूर्ती : शेतकऱ्यांसाठी पशु, कृषी तर युवकांकरिता रोजगार मेळावे

ऑनलाईन लोकमत
वर्धा : मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षी भाजपाची सत्ता येऊन २१ मार्च रोजी अध्यक्षाची निवड झाली. आज भाजप सत्तेची वर्षपूर्ती झाली. या एक वर्षात विविध कामे मार्गी लागली आहेत. यात पारधी आवास योजनेत वर्धा जिल्हा नागपूर विभागात तथा राज्यात प्रथम ठरला, हे विशेष! पारधी आवास योजनेत जिल्ह्याला २० घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्याची १०० टक्के पूर्तता करण्यात आली आहे.
२०१७-१८ या वित्तीय वर्षात पारधी समाजासाठी आवास योजनेतील २० घरकुल मंजूर करण्यात आले आहे. ही योजना अद्याप राज्यात कुठेही फारशी राबविली गेली नाही. सर्व घरकूल मंजूर करणारा वर्धा जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या नेतृत्वात विविध योजना राबविण्यात आल्या. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलास पात्र लाभार्थी जागेअभावी वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेत पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजना सुरू केली. यात जागेसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य केले जाते. याबाबत शासकीय जागेसाठी कारंजा तालुक्यात २०, आर्वी ६ प्रस्ताव मंजूर झालेत. शिवाय आर्वी २ व आष्टी तालुक्यातील २ खासगी जागेचे प्रस्तावही मंजूर केले. निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळता केला. जीवनोन्नती अभियानांतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविली जात आहे. यातील कौशल्य प्रशिक्षण केंद्र नागपूर व अमरावती येथे असून वर्धा जिल्ह्यातील २८० युवकांना प्रशिक्षण देत २३० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेत. १६० युवक-युवतींना पुणे, वापी (गुजरात) व औरंगाबाद येथे रोजगार दिले. शासनाच्या कमवा व शिका उपक्रमातून ३१५ मुला-मुलींना विद्यावेतनावर प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध झाला. ६५ युवकांना नागपूर येथे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जि.प. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून मुख्यमंत्री आरोग्य मॅराथॉन शिबिर घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २५:१५ चा निधी जि.प. कडे वळविण्यात आला. जि.प. च्या इतिहासात प्रथमच १७ सामूहिकचा तब्बल ४ कोटी ५० लाखांचा निधी सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला. पं.स. सभापतींना जि.प. च्या विषय समित्यांमध्ये स्थान देत अतिरिक्त वाहन उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बैठका लावून निकाली काढल्या. प्रधानमंत्री आवास योजनेत आदिवासी समाजाचे लक्ष्यांक वाढवून घेतले. राज्यात प्रथमच जि.प. वर्धाने शिक्षण विभागाच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून सिनेतारका निशीगंधा वाड यांची नियुक्ती केली आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे शेतकºयांसाठी पशु व कृषी मेळावे आयोजित करण्यात आले. महिला बालकल्याण विभागामार्फत महिला व किशोरी मुलींकरिता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावे घेण्यात आलेत. समाज कल्याणमार्फत जि.प. परिसरात येणाºया दिव्यांग बांधवांकरिता व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यातील ४० पशुचिकित्सालये आएसओ मानांकनास पात्र ठरली असून ३७ जिल्हास्तरावर तर ३ राज्यस्तरावर पात्र ठरले आहेत.

सर्व पदाधिकारी, जि.प. सदस्य, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. सामान्यांच्या समस्या विचारात घेत त्या सोडविण्याचा व जिल्ह्यात नवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूढील कार्यकाळात जनतेचे प्रश्न सोडवित त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- नितीन मडावी, अध्यक्ष, जि.प. वर्धा.

Web Title: Pardhi Awas Yojana is first in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.