पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:28 PM2018-08-26T22:28:01+5:302018-08-26T22:30:14+5:30

समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

Parents should encourage students | पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे

पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे

Next
ठळक मुद्देरामदास तडस : गुणवंतांचा गुणगौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर जे यश प्राप्त केले आहे. ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगली कामे होऊन त्यांच्या कार्याचा झेंडा सर्वत्र फडकावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, तेलरांधे, योगेश कुंभलकर, प्रतिभा बुरले, वंदना भुते, शुभांगी कोलते, शरद सहारे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या एकूण ११० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच याप्रसंगी सेलू नगरपंचायत समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शारदा माहुरे, पी.एच.डी. प्राप्त डोंगरे, छायाचित्रकार कवी भट यांचाही सत्कार करण्यात आला. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. योग्य शिक्षण आपल्या जीवनात महत्त्वाचे असून त्याची निवडही वेळीच विद्यार्थ्यांनी करावी. नविन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो, असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारावी असे आवाहन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रशांत सव्वालाखे, अतुल वांदीले, शेखर शेंडे, शोभा तडस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बुरले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रिया शेंदरे यांनी केले तर आभार सुनील शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाने, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे, शेखर लाजुरकर, सुप्रिया शिंदे, माया चाफले, माया उमाटे, मोना किमतकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Parents should encourage students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.