सेवाग्राम येथील गांधी चित्रप्रदर्शन नूतनीकरणासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:36 PM2018-04-04T14:36:33+5:302018-04-04T14:43:28+5:30
सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे. हे नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत पर्यटक व दर्शनार्थींना चित्र प्रदर्शन पाहता येणार नाही.
सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींचा आश्रम हा जगासाठी प्रेरणास्थान बनला आहे. त्यांची जीवनपद्धती, विचार, तत्त्व, कार्य हे आश्रमातील वस्तू व वास्तूतून दिसून येते आणि येथील वातावरणात एक वेगळीच भर घालते. येथे पर्यटक व दर्शनार्थींची दररोज गर्दी असते. येथे आल्यानंतर महात्मा गांधीजींवरील चित्र प्रदर्शनाला सगळे जण आवर्जून भेट देतात. हे चित्र प्रदर्शन मगन संग्रहालय समिती वर्धा यांना चालवण्यास दिले होते. त्यांनी त्याचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे या वास्तूत असलेले प्राकृतिक आहार केंद्र, खादी व ग्रामोद्योग केंद्र आणि साहित्य भंडार हेही मगन संग्रहालयात ११ एप्रिलपासून स्थानांतरित करण्यात येणार आहे.